भूत, प्रेत, पिशाच यात अजूनही अनेक जण गुरफटले आहेत. नुकतीच गटारी अमावस्या झाली आणि शहर तसेच परिसरातील रस्त्यांच्या अनेक कोपऱ्यात लिंबु, बाहुल्या आणि बरेच काही पडताना दिसत आहे. त्यामुळे अंधश्रद्धेच्या आहारी गेल्याची संख्याही कमी नसल्याचे दिसून आले. अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं हे करणीचं साहित्य गोळा देखील केलं होतं.
येळ्ळूर येथील वेशीत नुकतीच एक घटना घडली आहे. या वेशीत उलट्या पंखाच्या कोंबडा सोडुन देण्यात आला होता हा प्रकार अनेकांनी पाहिला मात्र पुढे जाण्यास कोणी धजावत नव्हते शेवटी एक शेतकरी पूढे आला. राजू मरवे असे त्या शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांनी हा सारा प्रकार पहिला. आणि अंधश्रद्धेत गुरफटणाऱ्या अनेकांना आश्चर्यांचा धक्काच दिला.
त्यांनी उलट्या पंखाच्या कोंबडा पकडला आणि ते घेऊन सरळ वडगाव गाठले.सामाजिक भान ठेवत त्यानि त्या कोंबड्याची विक्री केली. त्यातून जे पैसे येतील ते पैसे गरिबांना वाटून टाकले. अनेकांना सामाजिक जाणीव करून देऊन अंधश्रद्धा निर्मूलन करण्याची क्षमता ओलांडून दाखविली इतकंच नाही तर अंधश्रद्धा निर्मूलनाची एक प्रकारे जनजागृतीच केलीय.