प्रेमात सारे काही माफ असते असे म्हटले जाते. मात्र याच प्रेमात जर प्रेयसीचा खून करण्यात आला तर? अशीच एक घटना बैलहोंगल तालुक्यातील बेळवडी येथे घडली आहे.
१० महिन्यापुर्वी युवराज अब्बार आणि सुमाचे प्रेम जुळले. घरच्यांचा विरोध पत्करून त्यांनी न्यायालयात विवाह केला. मात्र काही दिवसात युवराज आणि सुमा यांचयात खटके उडू लागले. त्यातच युवराजच्या कुटुंबीयानी त्यांना घरी बोलावून घेतले. मात्र तेथील काही प्रकार सुमाला त्रासाचाच ठरू लागला.
केवळ १० महिन्याच्या प्रेमाला खुनाची किनार देण्यात युवराज यांच्या कुटुंबीयांचा हात असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे अनेकांचा प्रेमावरचा विश्वास उडाला असल्याचे बोलले जात आहे. खून करण्यापूर्वी विचार करण्याची गरज होती.
सुमा यांच्या कुटुंबीयांतर्फे दोडवाड पोलिस स्थानकात फिर्याद दाखल करण्यात आली आहे. मात्र सर्व आरोपी सासू, सासरा, दीर आणि पती फरारी असल्याचे पोलिसांनी सांगितले.