Friday, December 27, 2024

/

व्यापाऱ्यास आठ लाखास लुटले!

 belgaum

दोसा खायला गेला अन आठ लाख रुपये गमावून बसला अशी वेळ बेळगावला सोने खरेदी करायला आलेल्या महालिंगपूर येथील सोनारावर आली आहे.रस्त्या शेजारी कार थांबवून हॉटेल मध्ये दोसा खायला गेला असता कार चे ग्लास फोडून त्याच्या गाडीतील साडे सहा लाख रुपये रोख आणि दीड लाखांचे सोन्याचे दागिने लांबवल्याची घटना वडगांव येथे घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार महालिंगपूर येथील सोन्याचे व्यापारी मल्लापा संगप्पा सोनार हे सोने खरेदी करण्यासाठी बेळगावला आले होते वडगाव येळ्ळूर रोड येथील जिव्हेश्वर मंदिरा जवळ आपली कार थांबवून हॉटेल मध्ये दोसा खायला गेले होते त्यावेळी अज्ञातांनी त्याच्या कारचे ग्लास फोडून एकूण 6 लाख 32 हजार रोख रक्कम आणि एक लाख 52 हजार किंमतीचे दागिने असे दोन्ही मिळून आठ लाखास लुटले आहे.

महालिंगपूर चे सोनार मल्लप्पा यांनी शहापूर पोलिसांत लूट झाल्याची फिर्याद नोंदवली असून शहापूर पोलीस निरीक्षक जावेद मुशाफिरी अधिक तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.