के एल ई हे बेळगावातीलच नव्हे तर परराज्यातीलही एक नामांकित हॉस्पिटल म्हणून ओळखले जाते. त्यामुळे येथे सदैव गर्दी असतेच. मात्र या हॉस्पिटल शेजारी असलेल्या बस थांबाची असून अडचण नसून खोळंबा, अशी अवस्था झाली आहे. त्यामुळे याचा विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे.
के एल ई हॉस्पिटलमध्ये अनेक रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक येत असतात. त्यामुळे येथे गर्दी मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे बसने प्रवास करण्यासाठीही मोठी वर्दळ असते. मात्र तेथील बस थांब्याची दुरावस्था असल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे. याचा विचार प्रशासनाने करण्याची व परिवहन महामंडळाने प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.
या बस थांब्या समोर चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे या बस थांब्यात जाणेही कठीण बनले आहे. काही प्रवाशी थांब्यात जाण्याचेच टाळत आहेत. चिखल आणि समोरच पाणी साचल्याने डासांचा प्रादूर्भावही वाढला आहे. त्यामुळे रोगराई बरी करण्यासाठी जाणाऱ्या नागरिकांना आरोग्य धोक्यात घालण्यात येत असल्याचे दिसून येत आहे.
एकाच ठिकाणी दोन बस थांबे आहेत. मात्र दोन्ही जवळ चिखल आणि पाणी साचल्याने कोणतेच प्रवासी तेथे जाणे टाळत आहेत. याचा विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यामुळे येथील चिखल काढावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे. तेव्हा याचा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे.!