गटारी आमावस्या ही मंत्र तंत्र आणि काळी जादू करणाऱ्यांसाठी सुगीची आमावस्या. आपल्या विरोधकांचा काटा काढण्यासाठी टपून बसलेल्या व्यक्ती या दिवशी अशा मांत्रिकांकडे जाऊन हजारो रुपये खर्च करतात आणि त्यांच्याकडून करणी करून घेऊन ती सांगितलेल्या ठिकाणी ठेवली जाते. हा प्रकार अंधश्रद्धेचा आहे आणि नागरिकांनी या खोटारड्या करणी वर विश्वास ठेवू नका अशी हाक आज अंधश्रद्धा निर्मूलन समिती, बेळगाव ने दिली.
संभाजी चौक येथे आज चला करणी गोळा करायला हा कार्यक्रम झाला. केळी, लाल कापड,खिळे, बिब्बे,अंडी, टाचण्या अशा सगळ्या वस्तू गोळा करून त्या मांडण्यात आल्या होत्या. फलक लावून जागृतीही करण्यात आली.
प्रत्येक अमावास्येला चालणारा हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी येळ्ळूर भागातून आनंद चिठ्ठी, बेळगुंदि येथून मयूर मयूर नागेनट्टी, शंकर चौगुले, शहापूर भागातून गुरुवर्य परशुरामभाऊ नंदीहळ्ळी, सिद्धार्थ बोर्डिंगचे विध्यार्थी, बेळगाव परिसरातून भाई अशोक देशपांडे, राहुल पाटील, स्वातंत्र्य सैनिक विठ्ठलराव याळगी,ऍड राम आपटे हे सहकार्य करणार आहेत.
धर्मवीर संभाजी चौकात ही जागृती करण्यात आली.
मी येळ्ळूरच्या वेशीतील उलट्या पंखाचा कोंबडा पकडून आणला आणी चिकण दुकानात 150 रु विकून ते पैसे गरीबांना दिले.