बेळगाव-मुंबई-जयपूर आणि बेळगाव-पुणे-अहमदाबाद अशा दोन नवीन विमानसेवा एअर इंडिया तर्फे सुरू केल्या जाणार आहेत. काही सूत्रांकडून ही माहिती बेळगाव live ला मिळाली आहे.
बेळगावमध्ये एकेकाळी जिल्हाधिकारी पदी काम केलेले अधिकारी प्रदीपसिंग खरोला हे सध्या एअर इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक आहेत. त्यांना बेळगाव बद्दल विशेष प्रेम आणि आपुलकी आहे. बेळगावचे उद्योजक #saveixg सारखी मोहीम राबवतात, सिटिझन कौन्सिल सारख्या संघटना इतक्या मोठ्या प्रमाणात निवेदने देऊन पाठपुरावा करतात यावरून बेळगाव शहराला असलेली विमानसेवेची गरज किती आहे, याची कल्पना या अधिकाऱ्यांना आली आहे, आता एअर इंडिया ही गरज ओळखून बेळगावशी मुंबई, पुणे, जयपूर व अहमदाबाद ही शहरे सर्वात प्रथम जोडणार आहे.
विशेषतः बेळगाव करांनी मुंबईसाठी मागणी केली होती. या मागणीचा विचार पुढील महिन्यात करताना पुढील प्रवासाची कनेक्टिव्हिटी देण्याचा प्रयत्न एअर इंडियाने सुरू केला आहे.
उडान योजनेत बेळगावचा समावेश सप्टेंबर नंतर होऊ शकेल पण त्यापूर्वी एअर इंडिया आपले खाते खोलणार आहे.त्यामुळे बेेेळगाव मधून विमान प्रवास करणााऱ्यांना चांगले दिवस येतील.