कित्येकदा मागणी करून देखील सिटी बस थांबत नाहीत. म्हणून संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी शुक्रवारी सकाळी मुतगा येथे बस अडवून रास्ता रोको केला होता.एअर इंडियाचे बेळगाव बंगळुरू विमान सेवेचे उदघाटन उरकून बेळगावला परतत असलेल्या अधिकारी त्यांचा लवाजमा आणि 319 एअर बस चा बंगळुरू बेळगाव हा सुखद विमान प्रवास अनुभवून आलेल्या प्रवाश्यांना या रस्ता रोकोचा फटका बसला.
एकीकडे विमान उडवत असताना गोर गरीब मुलांनी शैक्षणिक मागणीसाठी हा बस रोको झाला होता. शिक्षणासाठी दररोज 15 की मी पायपीट करून बेळगावला येणाऱ्या विद्यार्थ्यांना मुतगा येथे बस थांबत नसल्याने चिडलेल्या मुलांनी बस रोको केला होता.
तालुका पंचायत सदस्य सुनील अष्टेकर यांनी तालुका पंचायत बैठकीत मुतगा येथे सूलेभावी कडून येणाऱ्या बस थांबत नाहीत त्यामुळं शाळकरी मुलांना याचा त्रास होतो. परिवहन खात्याच्या अधिकाऱ्यांनी आश्वासन दिलं होतं मात्र विद्यार्थ्यांची समस्या जैसे थे होती.
प्रशासनाला विनंती करून अनेकदा समजत नाही. मग, लोकशाहीतील वेगळं आंदोलन हाती घ्याव लागतं. आणि ह्या आंदोलनातून तेच झालं . उद्या पासून प्रश्न ‘हा’ मार्गी लागतोय.
विमान सेवा उदघाटनास पोलीस आयुक्त डी सी राजप्पा, उपायुक्त सीमा लाटकर,कॅटोंमेंट सी इ ओ दिव्या शिवराम,जिल्हा पंचायत अधिकारी डॉ रामचंद्र राव हे विमान उदघाटन करून परतत होते.पोलीस आयुक्त राजप्पा यांनी आंदोलन विद्यार्थ्यांना बाजूला हाकण्याचा प्रयत्न केला स्वतः काही काळ ट्रॅफिक हाताळली त्यावेळी विद्यार्थ्यांनी ‘विमान उडवला आता आमच्याकडे ही बघा’ म्हणत परिस्थिती कथन करून न्याय देण्याची विनवणी केली त्यावेळी पोलीस आयुक्तांनीच परिवाहन खात्याच्या अधिकाऱ्यांना संपर्क साधून शाळकरी मुलांच्या बस थांबवा अश्या सूचना केल्या.
यानंतर मुतगा येथील शिष्टमंडळाने परिवहन खात्याच्या अधिकाऱ्यांची भेट घेताच शनिवार पासून मुतगा येथे नियंत्रक नियुक्त करून शाळकरी मुलांना बेळगवकडे येण्यासाठी बस थाम्बवली जाईल. असेही आश्वासन देण्यात आले आहे.