मागील आठवड्यात शहरातील विविध दलित संघटनांनी बेळगावात शाहू महाराजांचा पुतळा उभारला जावा अशी मागणी विविध दलित संघटनांनी महापौर बसप्पा चिखलदिनी यांच्याकडे केली होती.त्या अनुसार महा पालिकेने बेळगावात शाहू महाराजांचा पुतळा उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
शुक्रवारी झालेल्या पालिकेच्या बैठकीत सदर विषय महापौरांनी काढला व त्यावर निर्णय झाला.शहराच्या कोल्हापूर कडील प्रवेशद्वारावर केएलई हाॅस्पीटलजवळ राजर्षी शाहू महाराज यांचा पुतळा उभारण्यात येणार असून या पुतळ्यासाठी एक कोटी रूपये निधी राखीव ठेवण्यात आला आहे. या पुतळा उभारणीसाठी एक समिती स्थापन केली जाणार आहे.
सत्ताधारी आणि विरोधी गटातील अनेक नगरसेवकांनी या विषयावर आपले मत व्यक्त केले व पुतळा उभारण्यास पाठींबा व्यक्त केला यासाठी समिती स्थापन करताना पारदर्शकता ठेवली जावी. शिवाय या सभागृहाची मुदत संपण्याआधीच पुतळा उभारणी करून अनावरण व्हावे, अशी विनंती दीपक जमखंडी यानी सभागृहास केली. शाहू महाराज यांच्या पुतळ्याजवळ त्यांच्या जीवनकार्याची माहिती मराठी व कन्नड भाषेत प्रदर्शित केली जावी जेणे करून त्यांचे विचार समाजाला समजतील अशी मागणी नगरसेविका मेघा हळदणकर यानी केली.
पालिकेचे नुकताच सेवा निवृत्त झालेले अतिक्रमण विरोधी पथकातील अधिकारी आणि दलित संघटनेचे नेते अर्जुन देमट्टी यांनी निवृत्ती निमित्य झालेल्या सत्कार समारंभात शाहू महाराजांचा पुतळा बेळगावात बसवू असा पण केला होता त्यातच दलित संघटनांनी महापौरांकडे पाठपुरावा देखील केला होता अनेकां कडून अनेक दिवसांची ही मागणी होती त्यानुसार शाहू महाराजांचा बेळगावात बसवण्याचा निर्णय झाला आहे.
काम लवकर सुरू करा
किल्ला तलावात गौतम बुद्धांचा तर शहराच्या प्रवेश द्वारावर राजश्री शाहू महाराजांचा पुतळा या आमच्या मुख्य मागण्या ! यासाठी आम्ही निवेदने दिलीत यातील एक मागणी म्हणजे शाहू महाराजांच्या पुतळ्याचा निर्णय पालिका सभागृहाने घेतला त्याचे स्वागत मात्र आता लवकरात लवकर काम सुरू व्हावे हीच अपेक्षा आहे.अशी प्रतिक्रिया दलित संघटनेने नेते मललेश चौगुले यांनी बेळगाव live कडे दिली आहे.