‘शहरातील रस्त्यांची अवस्था दयनीय असताना काँग्रेस रोडची झालेल्या दुर्दशेचा फलक घेऊन मराठी नगरसेवकांनी सभागृहात आवाज उठवला.काँग्रेस रोड साठी विशेष निधी द्या अशी मागणी करत सत्ताधारी गट नेते संजय शिंदे यांनी लक्षवेधी मांडली नगरसेवकांनी आंदोलन केले यावेळी बराच काळ सभागृहात गोंधळ माजला होता.
काँग्रेस रस्त्याची पहाणी करत असतेवेळी शहराचे प्रथम नागरिक असलेले महापौर पाहणी करत असतेवेळी त्यांच्या अंगावर चिखल उडाला यापेक्षा दुर्दैव काय असा प्रश्न करत मराठी नगरसेवकांनी सभागृह दणाणून सोडलं मात्र या मराठी नगरसेवकांच्या आंदोलनास विरोधी गट नेते दीपक जमखंडी यांनी आक्षेप घेत हा रस्ता आताच नाही तर चार वर्षे खराब होताच त्यामुळं आंदोलन करायची गरज नसल्याचं म्हटल्यावर सभागृहात गोंधळ झाला.नगरसेवक पंढरी परब किरण सायनाक आणि रतन मासेकर यांनी काँग्रेस रोड शहराचा आहे एका नगरसेकाचा नाही महापौरानी पाहणी करून देखील का दुरुस्ती झाली नाही असा प्रश्न उपस्थित करताच शाब्दिक चकमक उडाली. यावर आयुक्त शशिधर कुरेर यांनी उत्तर देत गणेश उत्सवाच्या आधी खड्डे बुझवले जातील या शिवाय हा रोड स्मार्ट सिटी मध्ये घालण्यात आला असून यासाठी 30 कोटींची तरतूद करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.बैठकीच्या सुरुवातील कै नगरसेवक पिंटू सिद्धीकी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
महिला कर्मचाऱ्यांस मारहाण केलेले एफ डी सी सक्तीच्या रजेवर
बर्थ आणि डेथ सेक्शन मधील महिला कर्मचारी संगीता गुडीमनी यांना एफ डी सी विजय कोट्टूर यांनी मारहाण केलेल्या विषयावर देखील सभागृहात जोरदार चर्चा झाली.एफ डी सी विजय कोट्टूर यांना सक्तीच्या रजेवर पाठवलं असल्याची माहिती महापौर बसप्पा चिखलदिनी यांनी सभागृहास दिली.नगरसेवक किरण सायनाक यांनी महिला कर्मचाऱ्यांस मारहाण करणाऱ्या एफ डी सी ची मेडिकल चाचणी झाली का असा प्रश्न उपस्थित केला तर नगरसेविका सरिता पाटील यांनी महिला कर्मचारी असुरक्षित असल्याचे ताशेरे पालिका प्रशासनावर ओढले त्यावेळी वरील कारवाई झाल्याची माहिती महापौरांनी दिली.