इराण मध्ये झालेल्या शालेय कुस्ती स्पर्धेत बेळगावच्या महेशकुमार लंगोटी याने रौप्य पदक पटकावत पुन्हा एकदा बेळगावचे नाव लौकिक केले आहे.इराण मध्ये झालेल्या एशियन चॅम्पियन स्पर्धेत या बेळगाव युवजन क्रीडा खात्याच्या कुस्ती पटूने नेत्रदीपक कामगिरी करताना 57 किलो वजन गटात फ्री स्टाईल प्रकारात रौप्यपदक मिळवलं आहे.भारताने 1 सुवर्ण तीन रौप्य आणि चार कांस्य अशी एकूण 8 पदकांसह तिसरा क्रमांक पटकावला आहे.
यापूर्वी बेळगावच्या मल्लांनी ग्रीको रोमन प्रकारात अनेक पदक मिळवली होती महेश कुमार मुरारी लंगोटी मूळ अथणी याने अप्रतिम खेळ करत हे यश साकारले आहे.या अगोदर कोणत्याच कर्नाटकातील खेळाडूंना फ्री स्टाईल कुस्तीत एशियन मेडल मिळवलं नव्हतं मात्र महेशकुमार याने नवीन इतिहास रचत बेळगावचे नाव कुस्तीत देशाच्या पटलावर नेऊन ठेवलं आहे.
बांगलादेश च्या कुस्ती पटूचा 10-0 पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला उपांत्य लढतीत पाकिस्तानी खेळाडूस आस्मान दाखवत 10-0 अश्या फरकांनी एकतर्फी विजय मिळवला मात्र अंतिम सामन्यात जपानच्या कुस्ती पटू सोबत बचावात्मक खेळ करत निसटता पराभव स्वीकारावा लागला.पहिल्या दोन फेरीत 2-2,4-4,अशी बरोबरी राखलो होती शेवटच्या तिसऱ्या फेरीत 6-8असा निसटता पराभव स्वीकारावा लागला.फ्री स्टाईल मध्ये आशिया साठी पहिलं मेडल मिळवलेल्या महेश कुमारचे बेळगाव live तर्फे अभिनंदन…