कलामंदिर चा विकास होणार हे आपण अनेक वर्षांपासून ऐकत आणि वाचत आलोय. पण आता स्मार्टसिटी योजनेतून हा विकास होणार आहे. कलामंदिर ची पुन्हा उभारणी करून स्मार्ट कमर्शियल कॉम्प्लेक्स होणार आहे.
सध्या टिळकवाडी येथील कलामंदिर हे कचऱ्याचे ट्रक ठेवण्याचे प्रमुख केंद्र आहे. तसेच तेथे एक आधार केंद्रही आहे. आता ते पाडवून नवीन बांधकाम केले जाणार असे समजले आहे.
१.१५ एकर जागा मोकळी होईल यावर ४३.५ कोटी निधी खर्च केला जाईल या कामाची निविदा काढली जात आहे.
२०१४ मध्ये मनपाच्या आणि नागरी भागीदारीतून हे कलामंदिर बांधण्याचे प्रस्ताव पुढे आले होते. खासगी गुंतवणूकदार घेण्याचा तसेच सरकारी कर्ज घेण्याचाही विचार करण्यात आला. पण पुढे काहीच झाले नाही.
पण आता स्मार्ट सिटी योजनेतून हा उपक्रम पूर्ण होईल. याठिकाणी विभागीय स्थरावरील नागरी सुविधा पुरवल्या जातील.
असा आराखडा
एकूण जागा: ७८०० चौ मिटर
मजले: G+३
सोयी:
१. मल्टि लेवल पार्किंग
२. मल्टी मोडल पार्किंग स्टँड
३.मल्टिप्लेक्स व शॉपिंग मॉल
४.मिनी सभागृह
५. इतर अनेक सुविधा येणार.