सायकल चालवत प्रवास करण्याचा ट्रिन ट्रिन हा उपक्रम पहिल्यांदा म्हैसूर इथे सुरू झाला. याचप्रमाणे बेळगाव मध्येही असाच प्रकल्प सुरू करण्याच्या हालचाली सुरु असून त्याकडे स्मार्ट सिटी लिमिटेड ने लक्ष दिले आहे. नागरिकांनी याबद्दल आपल्या सूचना द्याव्या असे आवाहन करण्यात आले आहे.
शहराच्या रस्त्यावरील वाहन संख्या कमी करून रस्ते मोकळे करण्याबरोबरच पर्यावरण रक्षण हा उद्देश यामागे आहे. शहरात वेगवेगळ्या ठिकाणी या सायकल उपलब्ध असणार आहेत. त्या सायकल घेऊन आपल्याला एक ठिकाणाहून दुसरीकडे जाता येईल व गेलेल्या ठिकाणी असलेल्या केंद्रात त्या सायकली देता येतील.यासाठी नोंदणी करून ठराविक शुल्क भरावे लागणार आहे.
बेळगाव सिटिझन कौन्सिल या संघटनेने मुख्य रस्त्यावर सायकल चालवण्यासाठी स्वतंत्र ट्रॅक सुरू करा म्हणजे सायकल चा वापर वाढेल व त्या चालवणाऱ्यांना अपघात किंव्हा वाहतूक कोंडीचा त्रास होणार नाही पर्यावरण पूरक होईल अशी मागणी अडीच वर्षा पूर्वी शहराचा स्मार्ट सिटीत समावेश होताच केली होती.तिसरा गेट ते काँग्रेस रोड संभाजी चौक चनम्मा के एल इ पर्यंत तर दुसरा शहापूर भागांत हा ट्रॅक करा अशी मागणी केली होती. आता हा नवीन उपक्रम राबवताना या मागणीचाही विचार करण्याची गरज आहे.