बेळगाव हे बेळगाव म्हणूनच ओळखलं जातंय हे केंद्रीय विमान उड्डाण राज्य मंत्री जयंत सिन्हा यांनी सिद्ध केलेलं आहे.बेळगावातील भाजपचे काही खासदार आणि आमदारांनी दिल्ली मुक्कामी भेट विमान सेवा सुरू करण्याची मागणी करायला गेले होते त्यावेळी त्यांनी त्यांना दिलेल्या बातचीत मध्ये बेळगाव शहराचा उल्लेख बेळगाव असाच केलाय.
केंद्रीय मंत्री जयंत सिन्हा यांनी सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या 52 सेकंद दिलेल्या माहितीत तब्बल तीन वेळा शहराचा उल्लेख बेळगाव असा केला आहे.कर्नाटकातील ज्या भाजपच्या लोकप्रतिनिधीनी बेळगाव चे नामकरण बेळगावी करण्यासाठी जोरदार प्रयत्न केले त्यांनाच केंद्रीय मंत्र्यांकडून बेळगाव असा उल्लेख ऐकायला मिळाला. आजही देश भरात दिल्ली दरबारी बेळगावला ‘बेळगाव’ असेच ओळखलं जातंय हे देखील याचेवरून पुन्हा एकदा सिद्ध झालंय. शहराचं नाव बेळगाव असं उल्लेख केल्या बद्दल केंद्रीय मंत्र्यांचं समस्त बेळगावकर जनते कडून आभार!
भाजप आमदार आणि खासदार द्वयीना सिन्हा यांनी आगामी ऑक्टोम्बर पासून बेळगाव मुंबई आणि बेळगाव चेन्नई अशी विमान सेवा सुरू करू असे आश्वासन दिले आहे.सप्टेंबरमध्ये उड्डाण फेज 3 ची बैठक होणार असून बेळगावचा देखील समावेश उड्डाण मध्ये करू असे सिन्हा यांनी म्हटलंय.
नेमकं काय म्हणाले जयंत सिन्हा कसं केवळ 52 सेकंदात तब्बल तीन वेळा शहराचं नाव बेळगाव असा उल्लेख केला पहा खालील लिंक मध्ये
https://m.facebook.com/story.php?story_fbid=659410404416556&id=375504746140458