ज्या ग्राम पंचायतीला ग्राम विकास अधिकारी नाही त्या ग्राम पंचायतचा विकास खुंटतो असे म्हणतात. जिल्ह्यात पीडिओच्या कमतरतेमुळे विकास खुंटल्याचे सांगण्यात येत होते, त्यामुळे आता लवकरच आठवड्याभरात जिल्ह्यात ४३ नवीन पीडिओना रुजू करून घेण्यात येणार आहे.
शनिवारी विविध भागात काही पीडिओनी कार्यक्रम आयोजित केले आहेत. जिल्ह्यातील अनेक नूतन पीडिओना यावेळेस मार्गदर्शन करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील अनेक पीडिओची बदलीही होणार असल्याची माहिती मिळाली आहे.
सध्या अनेक ग्राम पंचायत मध्ये ग्राम विकास अधिकारी नसल्याने गावातील बरीच कामे रखडल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यात ग्राम विकास अधिकारी यांची नेमणूक करण्यात यावी, अशी मागणी होत होती. मागील दोन महिन्यांपासून याबाबत प्रक्रिया सुरू होत्या.
आता नूतन ग्राम विकास अधिकारी याचे प्रशिक्षण संपले आहे. आता आणखी दोन दिवस हे प्रशिक्षण असून लवकरच त्यांना ग्राम पंचायतचा कारभार सोपविण्यात येणार आहे. जिल्ह्यात ४३ ग्राम पंचायत विकास अधिकाऱ्यांना आता सरकारदप्तरी जुंपण्यात येणार आहे. याबाबत दोन दिवसात आदेश येणार असल्याची माहिती मिळाली आहे.