गणपतीचे आगमन अजून एक महिन्यापेक्षा अधिक काळ लांब असताना सगळ्याच लाडक्या बाप्पाची चाहूल लागली आहे त्यातच घरघुती मूर्ती कशी असली पाहिजे, आकार कोणता, सजावट कशी यावर सगळेच जण आता पासूनच चर्चा करत असतात.
घरघुती गणेश मूर्ती पी ओ पी ऐवजी शेडूच्या असाव्यात त्यांचा रंग देखील पर्यावरण पूरक असावा असे विचार करणाऱ्यांची संख्या वाढतच आहे म्हणून पर्यावरण पूरक मूर्ती बनवण्याऱ्यांची संख्या देखील वाढली आहे.उद्यमबाग ब्रह्मनगर येथे राहणारा एक युवक सागर मुतगेकर यांनी आपल्या घरी काही शेडूच्या बनवुन तर काही मूर्ती बाहेरून मागवुन त्यांना खास करून खाण्यात वापरात येणारे रंग लावून मूर्ती बनवल्या आहेत.
वॉटर कलर खास खाण्यात वापरण्यात येणारे म्हणजे रंग हळद पावडर ,शेंदूर,कुंकू,चोक पावडर,गुलाल,मुलतानी माती ,काला बुक्का असे रंग त्यांनी मूर्तींना दिले आहेत. सागर यांनी अनेक मुर्तीकाराना भेटून खाण्यात वापरणारे रंग वापरून मूर्ती बनवण्यासाठी विनंती केली होती मात्र मूर्तिकाराकडून त्याला प्रतिसाद मिळाला नाही म्हणून त्यांनी स्वतः हा पर्यावरण पूरक प्रयोग सुरू केला आहे.
त्या स्वराज कला केंद्र हरी मंदिर शेजारी बेळगाव येथे विक्री साठी ठेवल्या आहेत .शिव प्रतिष्ठानचा कार्यकर्ता असलेल्या सागर यानें पर्यावरण पूरक रंग काम असलेल्या गणेश मूर्ती तयार करण्याच्या उपक्रमास नक्कीच शुभेच्छा देता येतील.