कन्नड मध्ये एक म्हण आहे ‘यारदो दुड यल्लम्म जात्रे'(कुणाचे तर पैसे आणि कुणाची तर जत्रा) त्याच प्रमाणे कर्नाटक सरकारच्या आमदारांनी विविध भत्त्याच्या नावाखाली कोट्यवधी रुपये खर्च केल्याची माहिती समोर आली आहे.आर टी आय कार्यकर्ते भिमापा गडाद यांनी सदर माहिती बाहेर काढली आहे.
मागील सिद्धरामय्या सरकारने आमदारांचा पगार प्रवास भत्ता,विदेश दौरा खर्च,रेल्वे प्रवास भत्ता,मेडिकल भत्ता असा विविध खर्च मिळून राज्य सरकारच्या खजिन्यातून तब्बल 235 कोटी रुपये खर्च झाल्याची माहिती भिमापा गडाद यांनी उघडकीस आणली आहे.
दर महिन्याला आमदारांना राज्य सरकार कडून होणार खर्च त्यांचा पगार भत्ता त्यांना मिळणारी रक्कम पाहिल्यास तुम्ही अचंबित होऊन जाल
दर महिन्याला मासिक वेतन 25 हजार,
दूरध्वनी खर्च 20 हजार प्रति महिना,
मतदार संघ भत्ता 40 हजार प्रति महिना ,
महिन्याचा इतर खर्च 5 हजार,
खोली साठी पी ए पगार 10 हजार प्रति महिना ,
प्रवास भत्ता प्रति कि. मी. 25 रुपये प्रमाणे, दिवसाला 2 हजार भत्ता,
पर राज्य प्रवासाला दिवसाला 2500 रुपये भत्ता तर हॉटेल वास्तव्य 5000 रुपये,
वरील खर्च पहाता राज्य सरकार अशी जनतेच्या पैश्याची लूट करत असल्याचा आरोप होत आहे.
पाच वर्षात आमदारांचा पगार 90 कोटी, वास्तव्य खर्च 63 कोटी,विमान रेल्वे आणि विदेश प्रवास खर्च 106 कोटी,6 कोटी आमदारांचा वैधकीय खर्च, प्रत्येक आमदाराला रेल्वे प्रवासासाठी दोन लाख रुपये, खर्च झाल्याची माहिती गडाद यांनी काढली आहे.