Saturday, December 21, 2024

/

‘पाचव्यांदा इस्लामियाने पटकावला रॉयस्टन गोम्स चषक’

 belgaum

ऊन पावसाचा लपंडाव आणि हजारो फुटबॉल प्रेमींच्या उपस्थितीत इस्लामिया हायस्कुलने सेंट झेवियर्स हायस्कुल संघाचा पराभव करत रॉयस्टन गोम्स स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं.मंगळवारी दुपारी फिनिक्स शाळेच्या मैदानावर पंधरा हजार हुन अधिक फुटबॉल प्रेमींच्या साक्षीने इस्लामिया ने पाचव्यांदा या चषकावर नाव कोरले.सामन्यातील एकमेव विजयी गोल उत्तराधार्त 59 व्या मिनिटाला साबीर पठाण ने केला.

प्रमुख पाहुणे म्हणून बेळगाव जिल्हा फुटबॉल संघटनेचे अध्यक्ष पंढरी परब यांच्या उपस्थितीत सामन्यास सुरुवात झाली.सामना सुरू झाल्या पासून शेवटपर्यंत रंगत होती अन् शेवटच्या क्षणा पर्यंत सामना दोन्ही संघा कडे झुकत होता.दोन्ही संघाच्या गोल किपरनी अप्रतिम गोल रक्षण करत चार चार गोलाच्या संधी अडवल्या होत्या. हाफ टाईम पर्यंत गोल स्कोर कोराच होता एकुणच अटी तटीच्या या सामन्यात शेवटच्या क्षणी इस्लामिया संघाने बाजी मारली अन विजयी स्कोर करत एकच जल्लोष केला.

Islamiyaव्हिक्टर परेरा पंढरी परब आणि रॉयन गोम्स यांनी विजेत्या संघास आणि विजेत्या खेळाडूंना बक्षिसे वितरित केली.पात्रता फेरीतील बेस्ट प्लेयर पुरस्कार- मुथुराज लागली फिनिक्स शाळा,उत्कृष्ट गोल रक्षक समर्थ दुरादुनडी के एल एस, पात्रता फेरीत अधिक गोल केल्याचा पुरस्कार गोमटेशच्या श्रवण जाधवला मिळाला.

मुख्य लढतीतील पुरस्कार
बेस्ट प्लेयर:कैफ शेख इस्लामिया
बेस्ट गोल किपर:सफियान मुल्ला फिनिक्स पब्लिक स्कुल
सर्वाधिक गोल:कैफ शेख इस्लामिया

St xeviars

सेंट झेवियर्स सातव्यांदा दुर्दैवी
आता पर्यंत 39 वेळा झालेल्या रॉयस्टन गोम्स स्पर्धेत तब्बल सात वेळा अंतिम सामन्यात प्रवेश करून देखील सातवेळा देखील उपविजेते पदावर समाधान मानावे लागले आहे.यावेळी इस्लामिया सह झेवियर्स ला देखील समान संधी होती दोघांचा खेळही समानच झाला मात्र दुर्दैवाने झेवियर्स चॉकर्स मधून बाहेर पडू शकले नाहीत.आता पर्यंत सेंट पॉल ने हा चषक 25 वेळा जिंकला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.