आगामी निवडणुका ए व्ही एम व्ही व्ही पॅट मशीन वर निवडणूका घेऊ नका बॅलेट पेपर वर निवडणुका घ्या अशी मागणी निवडणूक आयोगाकडे करण्यात आली आहे.जिल्हाधिकारी कार्यालया समोर निदर्शन करत भ्रष्टाचार निर्मुलन परिवार या संघटनेने सदर मागणी केली आहे.
जनतेचा ए व्ही एम व्ही व्ही पॅट वर चा विश्वास उडाला आहे त्यामुळे आगामी लोकसभा निवडणूक ही बॅलेट पेपर द्वारे घ्यावी अस निवेदन जिल्हाधिकाऱ्या द्वारे निवडणूक आयोगाकडे करण्यात आली आहे. ए व्ही एम वर जनतेचा विश्वास नाही स्ट्रॉंग रूम पासून 3 की मी अंतरावर इंटरनेट सुरू असू नये हा नियम पाळला गेला नाही या सगळ्या गोष्टी संशयास्पद आहेत.लोकशाहीत निवडणूक पध्दतीवर अविश्वास येऊ नये त्यामुळे लोकशाहिला बाधा येता कामा नये यावर असमाधान व्यक्त करण्यात आले आगामी लोकसभेत बॅलेट पेपर वर निवडणूक घ्या अशी मागणी केली आहे.
भ्रष्टाचार निर्मूलन परिवाराचे अध्यक्ष सुजित मूळगुंद,मल्लिकार्जुन जकाती,संजय पाटील, नागप्पा लाड,लतीफ पठाण, आदी यावेळी उपस्थित होते.