भडकल गल्ली येथे पूर्वीपासून गेली पन्नास वर्षे तिसरी पिढी शाडूपासून गणेशमूर्ती बनविण्याचे काम करीत आहे पीओपी ला वाढलेली मागणी शालूला न मिळणारा दर रंगाचे वाढलेले दर गणेश भक्ताकडून मिळणारी तुकडी रक्कम यामुळे या व्यवसायाला दोन वर्षे पालकर कुटुंबाने राम राम ठोकला होता मात्र गणेशभक्तांच्या मागणीने पुन्हा शाडूपासून गणेश मूर्ती बनविण्याचा व्यवसाय भडकल गल्ली येथे मूर्तिकार यल्लाप्पा पालकर करीत आहेत.
एक फुटापासून अडीच फुटांपर्यंत शाडूच्या मृत्यू यंदा बनवण्यात आल्या असून त्याचा दर सुद्धा पाचशे रुपयांपासून अडीच हजार रुपयापर्यंत आहे खानापूर तालुक्यातील शाडू विकत घेऊन त्यावर रासायनिक रंग वापरून पर्यावरण पूरक असा गणेश मूर्ती बनवण्याचा व्यवसाय गेल्या तीन पिढ्या पालकर घराणे करीत आहे यंदा गणेश भक्तांच्या आकर्षक गणेश मूर्ती पालकर बंधूनी बनवलेले आहेत या व्यवसायामध्ये त्यांचा मोठा चिरंजीव परशराम नातवंडे तन्मय व श्रीनय सुद्धा शाडू मूर्ती बनवण्याचे काम करीत आहेत याशिवाय याशिवाय काळा मातीच्या चिकन माती पासून आकर्षक शोभेच्या वस्तू देखील ते बनवितात.
सध्या आरोग्याच्या दृष्टीने पूरक असलेले मातीची भांडी व साहित्य बनवण्याकडे त्यांचा कल आहे त्यासाठी खानापूर तालुक्यातील चिकन गाळाची माती आणून ते व्यवसाय करण्यात मग्न आहेत पर्यावरण पूरक गणेश मूर्ती गणेश भक्तांनी पुरवावी पीओपी पासुन बनवलेली श्रीमूर्ती लवकर करता येते मात्र शाडूपासून गणेश मूर्ती बनवायला विलंब लागतो त्यासाठी आकर्षक कलाकृती करण्यासाठी बराचसा वेळ खर्ची लागतो यामुळे शाडू मूर्ती महाल आहे असे असले तरी दरवर्षी भक्तांना माफक दरात ते गणेश मूर्ती पुरवत असतात पर्यावरण प्रेमींनी शाडूच्या मूर्ती घेतल्या पाहिजे कुणालाही हवे असल्यास भडकल गल्ली येथे संपर्क करायला हरकत नाही.