वडगाव येथील मंगाई देवी भाविकांच्या नवसाला पावते असे मानले जाते म्हणूनच याही वर्षी या यात्रेला भाविकांनी प्रचंड गर्दी केली आहे.
आज सकाळी पासूनच यात्रेला प्रारंभ झाला आहे. सकाळी देवीला पोळीचा प्रसाद देण्यात आला असून नवसाची परतफेड करण्याचे काम दुपारपासून सुरू झाले आहे.
शेकडो वर्षाची परंपरा लाभलेल्या या मंगाई देवीला वार पाळून गाऱ्हाणे घालण्यात आले. दुपारी 12 वाजता मंगाई देवी पंच कमिटीच्यावतीने गाऱ्हाणे उतरविण्याचा कार्यक्रम पार पडला. यावेळी अरुण चव्हाण पाटील, शांताराम चव्हाण पाटील, शशिकांत चव्हाण पाटील, रणजित चव्हाण, अनंत चव्हाण पाटील, रत्नकांत चव्हाण पाटील, युवराज चव्हाण पाटील, योगेश चव्हाण पाटील, संदीप चव्हाण पाटील, जयराज हलगेकर उपस्थित होते
वडगावसह खासबाग, शहापूर, जुनेबेळगाव, अनगोळ, बेळगाव आदी भागासह आसपासच्या ग्रामीण भागातील लाखो भाविकांनी यात्रेनिमित गर्दी झाली आहे. रात्रीपर्यँत 2 लाख भाविक देवीचे दर्शन घेण्याची शक्यता आहे. गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी व कोणताही गोंधळ होऊ नये यासाठ.सर्व व्यवस्था शहापूर पोलिसांनी सज्ज ठेवली आहे. पोलीस निरीक्षक जावेद मुशापुरी यांच्या मार्गदर्शनाखाली ही सोय देण्यात आली आहे.
आज वडगाव भागातील आमंत्रणे सर्वच भागात गेली असल्याने भाविकांची रांग लागत आहे. मंदिर परिसरात भाविक मोठ्या संख्येने उपस्थित आहेत.वेगवेगळ्या भागातून नागरिक या यात्रेला गर्दी करत आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाही या यात्रेत लाखो रुपयांची उलाढाल होत आहे.