बेळगाव चेंबर ऑफ कॉमर्स 2018-19 च्या चेंबर ऑफ कॉमर्स पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे मंगळवार 7 आगष्ट रोजी फौंड्री क्लस्टर च्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमात वितरित केले जाणार आहेत.
चेंबर ऑफ कोमर्सचे अध्यक्ष उमेश शर्मा यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात पुरस्कारांची घोषणा केली आहे.बस कोच बनवणाऱ्या एम जी ऑटोमोटिव्हज दिलीप दामले ट्रष्ट अवार्ड,पारेख पेंट्स ला बी बी कागगणगी मेमोरेबल फंड अवार्ड,श्रीराम हार्डवेअरला कै मधुकर हेरवाडकर पुरस्कार देण्यात येणार आहे. सेंट्रल जी एस टी आयुक्त बिजॉय कुमार,कासिया चे अध्यक्ष बसवराज जवळी,आणि तरुण भारत ट्रष्ट जगदीश कुंटे यांच्या हस्ते या कार्यक्रमात पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.