बांधून चार महिने झालेले नसताना ओल्ड पी बी रोड वरील रेल्वे उड्डाणपूल पडण्याच्या मार्गावर आहे. पहिल्या पावसातच ब्रिज च्या काही भागातून खाली पाणी पडत आहे तर काहिभाग खचला आहे.
या भागातील नागरिकांनी बेळगाव live ला संपर्क साधून याची माहिती दिली आहे. पहिल्याच पावसात हा उड्डाण पूल खचला असून तो जास्त काळ टिकणार नाही असे नागरिकांनी सांगितले असल्याने बेळगाव live ने शोध घेतला असता याठिकाणी दिसलेला प्रकार धोकादायक वाटला आहे. या खचलेल्या भागाची छायाचित्रे बेळगाव live ने मिळवली आहेत.
या उड्डाणपुलाला छत्रपती शिवाजी महाराज पूल असे नाव दिले आहे. या पुलावरील रहदारी वाढत चालली आहे. मात्र पुलाच्या टीकाऊपणावर संशय निर्माण झाला आहे.
एल सी क्र ३८८ म्हणून हा पूल ओळखला जातो. ४० फूट रुंद असलेल्या या पुलाच्या बांधकामासाठी १८ महिने लागले आहेत.एकूण २४ कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. या पुलाची उभारणी १४ पिलर वर असून १० रुपाली हॉल पर्यंत आणि ४ जिजामाता चौकापर्यंत आहेत.
हा ब्रिज आचारसंहिता असल्याने बांधकाम संपल्यावर लगेच नागरिकांना खुला करण्यात आला आणि सर्व्हिस रोडही योग्य बनवण्यात आलेला नाही अशी तक्रार आहे.
आता ब्रिजचं पडणार असा आरोप झाला असून छायाचित्रे पाहता तसेच दिसत आहे, जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त आणि पोलीस आयुक्तांनी याकडे त्वरित लक्ष देण्याची गरज आहे.