अनेकांचे आनंदाचे क्षण कॕप्चर करणारा तो. स्वतःच्या कुटुंबाला दुःखाच्या सागरात लोटून गेला. तो घरातील कर्ता धरता पश्चात्य आई आणि लहान भाऊ…घरची परिस्थिती गरिबीची असे असताना त्यानं चुकीचं पाऊल उचललं अन घरच्या मंडळींना आणखी त्रासात सोडून गेलाय. ही गोष्ट आहे बेळगाव तालुक्यातील मुचंडी गावातील मयत राहुल ताशीलदार याच्या कुटुंबियांची
फोटो ग्राफी व्यवसायात नुकसान झाल्याने गावात घातलेला फोटो स्टुडिओ साठी काढलेले कर्जाची व्यवस्थित परतफेड न झाल्याने नाराजीने मानसिक नैराशयेतून मुचंडी येथील राहुल बाळू ताशीलदार याने विष प्राशन करून आत्महत्या केली आहे शनिवारी रात्री ही दुर्दैवी घटना घडली आहे या प्रकरणी मारिहाळ पोलिसात गुन्हा नोंद झालाय.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवारी रात्रीच राहुलने विष प्राशन केले होते उपचारासाठी त्याला बेळगावातील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र उपचारांचा काहीही उपयोग झाला नाही.राहुलच्या वडिलांचे लहानपणीच निधन झाले होते मोठया कष्टाने आईने त्याला त्याच्या लहान भावाला मोठं केलं होतं.वयात येताच त्याने गावात फोटो स्टुडियो घातला होता नवीन कॅमेरा देखील खरेदी केला होता कॅमेरा डॅमेज झाला होता मात्र यासाठी काढलेल्या कर्जाची परतफेड न झाल्याने तो निराश होता.विष प्राशन करण्याआधी त्याने फेसबुक अकाउंट वरील स्वतःचे वयक्तिक सर्व फोटो देखील डिलीट केले होते.
फोटो स्टुडिओ असुदेत किंवा आणि कोणताही व्यवसायात नुकसान झालं म्हणून जिद्दीने पुढे जाण्यापेक्षा गरीबीला कंटाळून आत्महत्या करणे योग्य नव्हे मात्र राहुलच्या या चुकीचा त्रास त्याची आई आणि 16 वर्षीय लहान भावाला होणार आहे.