मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मूळ बेळगाव जिल्ह्यातल्या एका युवकाने कोल्हापूर येथे आत्महत्या केली आहे.नोकरी मिळत नसल्याने कणेरीवाडी येथील युवकांने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली विनायक परशुराम गुदगी वय 26 असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे.
मराठा आरक्षणाचा कोल्हापूर जिल्ह्यातील पहिला बळी आहे विनायक चे मूळ गाव हुक्केरी तालुक्यातील दडडी आहे. त्याचे शिक्षण मराठीत झाले होते गावात नोकरी करत होता कन्नड भाषा येत नसल्याने तो दडडी तुन कोल्हापूर मध्ये शिफ्ट झाला होता.याबाबत अधिक माहिती अशी की विनायक याचे बारावीपर्यंत शिक्षण झाले असून त्यांनी कॉम्प्युटरचा कोर्स केला होता. दरम्यान त्याला नोकरी मिळत नसल्याने गेली काही दिवस तो निराश होता. या निराशेतून विनायकने आज राहत्या घरी तुळीला गळफास घेऊन आत्महत्या केली. तिच्या लहान भावाने त्याला खाली उतरून घेऊन उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल केले दरम्यान उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
आत्महत्ये नंतर कोल्हापूर मध्ये काय झालं:
मराठा समाजाच्या वतीने कोल्हापूर येथील दसरा चौकात रास्ता रोको करुन सरकारचा तीव्र शब्दात निषेध करण्यात आला.वेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सुद्धा रस्त्यावर ठाण मांडले.वातावरण तणावपूर्ण झाल्याने प्रचंड पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.दरम्यान शवविच्छेदनानंतर विनायक गुदगी यांचे पार्थिव ठिय्या आंदोलनाच्या ठिकाणी आणुन सामुदायिक श्रद्धांजली वाहण्यात आली.दिवसभर तणावपूर्ण वातावरण होते.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी सकल मराठा समाजाच्या वतीने सर्वत्र आंदोलन सुरू आहे.कोल्हापूरातही ऐतिहासिक दसरा चौक येथे छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्या समोर बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू असुन,दिवसेंदिवस आंदोलनाला पाठिंबा वाढतच आहे.गांव बंद ठेवून पायी चालत तसेच दुचाकी रॅली ने पाठिंब्यासाठी आज सकाळ पासून गर्दी होऊ लागली होती.
एकिकडे आंदोलन शांततेत सुरू असतानाच,मराठा आरक्षणासाठी एका युवकाने आत्महत्या केल्याची वार्ता समजताच आंदोलन तणावपूर्ण बनले.आंदोलनातील दिलीप देसाई,वसंत मुळीक,इंद्रजित सावंत,हर्षल सुर्वे,स्वप्निल पार्टे आदिंनी छत्रपती प्रमिलाराजे शासकीय रुग्णालयात धाव घेतली.येथेही तणावपूर्ण वातावरण झाले होते.याचवेळी दसरा चौक येथे आंदोलकांनी रास्तारोको आंदोलन करत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सह सरकार विरोधात तीव्र घोषणाबाजी सुरू केली.यावेळी ठिय्या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी आलेले माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सुद्धा या रस्त्यावर ठाण मांडून सरकारचा निषेध केला.भर पावसात हे आंदोलन सुरू होते. यानंतर पृथ्वीराज चव्हाण यांच्या कडुन श्रद्धांजली वाहण्यात आली.
दरम्यान दुपारी शवविच्छेदनानंतर विनायक गुदगी याचा मृतदेह दसरा चौकात रुग्णवाहिकेतून दाखल होताच पुन्हा वातावरण भावनिक झाले.यावेळी उपस्थित आंदोलकांच्या वतीने सामुदायिक श्रद्धांजली वाहण्यात आली.तसेच यापुढे कोणी आत्महत्या करायची नाही.मरायचे नाही तर मारायचे असे आवाहन करुन,आतापर्यंत मराठा आरक्षणासाठी तेवीस आत्महत्या झाल्या. मुख्यमंत्र्यांना आता किती जणांचा बळी घ्यायचा आहे असा संताप व्यक्त करणारा सवालही आंदोलकांच्या वतीने करण्यात आला.