भाजप महानगर बैठक सुरू होताच संतप्त भाजप पदाधिकाऱ्यांनी खासदार सुरेश अंगडी आणि जिल्हाध्यक्ष राजेंद्र हरकुनी यांना चांगलेच धारेवर धरून बैठकीत गोंधळ घातला.रविवारी भारतीय जनता पार्टी बेळगाव महानगर जिल्हा तर्फे कन्नड साहित्य भवनात जिल्हा कार्यकारिणी सभा झाली त्यावेळी अनेक भाजप पदाधिकाऱ्यांनी स्टेज जवळ येऊन गोंधळ घातला मोदी येडियुरप्पा बेळगावात येताच का कधीच महानगर पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेतले जात नाही असा आरोप करत कधीच बैठक नसताना निर्णय घेऊ नका असे आक्षेप घेऊन अध्यक्ष राजेंद्र हरकुनी, खासदार सुरेश अंगडी यांना धारेवर धरले.
कार्यकर्ते आणि कार्यकारिणी सदस्य महत्वाचे आहेत. सगळ्यांना विश्वासात घेऊन काम करा महानगर भाजप कार्यकारिणी विसर्जित करून नवीन कार्यकरिणी नियुक्त करा अशी मागणी संतप्त भाजप कार्यकर्त्यांनी केली अशी मागणी लावून धरतात गोंधळाचे वातावरण निर्माण झालं होतं.बैठकीत खासदार सुरेश अंगडी,जिल्हा अध्यक्ष राजेंद्र हरकुनी,राष्ट्रीय किसान मोर्चा शंकर गौडा पाटील,एम बी जिरली,नगरसेवक दीपक जमखंडी, संजय सव्वाशेरी उपस्थित होते.
आगामी काही दिवसात महापालिका आणि लोकसभा निवडणूका समोर आहेत त्यामुळं भाजपातील मतभेद चव्हाट्यावर आणूया नकोत एकत्र बसून चर्चा करून वाद मिटवूया अशी विनवणी खासदार अंगडी यांनी केली मात्र तरी देखील भाजप पदाधिकारी शांत झाले नव्हते त्यांनी खासदारकीसाठी नवीन चेहरा आणा अशी मागणी देखील कार्यकर्त्यांनी केली.
आगामी महा पालिका आणि लोकसभा निवडणुकीच्या पाश्वभूमीवर भाजप पदाधिकाऱ्यां कडून खासदार अंगडी यांना धारेवर धरणे म्हणजे खासदार अंगडी यांना भाजपचा अंतर्गत विरोध सुरू झाल्याची चिन्हे आहेत.