बाळेकुंद्री खुर्द गावातील रस्ता तसाच आणि ६२ लाख खिशात या प्रकरणात ग्रामपंचायतीने कुठलाच भ्रष्टाचार केला नाही. या रस्त्याचे कंत्राट घेतलेल्या खासदारांच्या चुलत भावाने हे पैसे खाल्ले आहेत. आणि भ्रष्टाचार चा आरोप करणाऱ्यांनी स्वतः किती कामे केली आहेत याचाही विचार केला पाहिजे. असा प्रतिआरोप या गावाच्या ग्रामपंचायतीचे सदस्य युवराज जाधव यांनी केला आहे.
हा रस्ता न होण्याला पूर्णपणे खासदार महाशयांचा भाऊ जबाबदार आहे. त्यांनी या रस्त्याचे कंत्राट त्याला मिळवून दिले होते. पण रस्ता होईल आणि गावाला एक चांगला रस्ता मिळेल ही ग्रामपंचायतीची भावना होती. परंतु आमदार निधीतून मंजूर झालेला हा रस्ताच झाला नाही. तक्रार बरोबर आहे पण यात ग्रामपंचायत जबाबदार नाही असे त्यांनी बेळगाव live ला सांगितले.
काहीजणांनी पीडिओ ना टार्गेट करून वेगवेगळ्या कारणासाठी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला आहे. शनिवारीही ग्राम पंचायतीला टाळे ठोकण्याचा प्रयत्न झाला आहे. पण असे प्रकार करणाऱ्यांनी स्वतः आपण किती कामे करून आणली हे पहिल्यांदा बघावे असेही त्यांनी सांगितले.
रस्ता तसाच आणि ६२ लाख खिश्यात या आशयाखाली बेळगाव live ने विशेष वृत्त प्रसिद्ध केले होते. आता एकमेकांवर आरोप होत आहेत. ज्या खासदाराने आपल्या भावाला कंत्राट मिळवून दिले त्यानेच आता तो रस्ता करून देण्याची मागणी होत आहे.