बेळगावातील किल्ला तलावाच्या मधोमध गौतम बुद्धाचा पुतळा बसवून या जागेचे सुशोभीकरण करा आणि या बेटाचा पर्यटन स्थळ म्हणून विकास करा अश्या सूचना माजी पालकमंत्री आणि यमकनमर्डीचे आमदार सतीश जारकीहोळी यांनी केल्या आहेत.
शुक्रवारी सायंकाळी महापौर बसप्पा चिखलदिनी,पालिका आयुक्त शशिधर कुरेर ,अभियंते आर एस नाईक यांच्या सह त्यांनी किल्ला तलावाच्या मधोमध असलेल्या खुल्या जागेची पाहणी करून त्यांनी अधिकाऱ्यांना सूचना केल्या.
बेळगाव शहरात किल्ला तलावाचे इतके सुन्दर सौन्दर्यीकरण झालेले असताना, बाजूला देशात उंच तिरंगा ध्वज असताना त्या खुल्या जागेचा वापर पर्यटन स्थळ म्हणून झाला पाहिजे यासाठी आराखडा तयार करा अन या बेटाचा विकास पर्यटन स्थळ म्हणून करा अश्या सूचना दिल्या.
या खुल्या जागेत हॉटेल करून पर्यटन करता येऊ शकते का या ठिकाणी गौतम बुद्ध यांचा पुतळा बसू शकतो का याची पहाणी यावेळी करण्यात आली.यावेळी राजू अंकलगी,अनिल पावशे यांच्या सह अनेक जारकीहोळी समर्थक उपस्थित होते.
किल्ला सम्राट अशोक चौक आहे जवळच देशातील उंच तिरंगा ध्वज आहे म्हणून त्या खुल्या जागेत गौतम बुद्ध यांचा पुतळा बसवता येईल का याबद्दल सविस्तर चर्चा झाली अशी माहिती महापौर बसप्पा चिखलदिनी यांनी बेळगाव live कडे बोलताना दिली.