बेळगावचा भुईकोट किल्ला इतिहासाचा साक्षीदार आहे. हा किल्ला १२ एप्रिल १८१८ साली ब्रिटिशांनी जिंकला होता. सध्या २०१८ साल सुरू आहे, या घटनेला २०० वर्षे पूर्ण झाली आहेत.
ब्रिगेडियर जनरल मुनरो यांनी हा किल्ला जिंकून मद्रास मिलिटरी कमांड मध्ये ठेवला होता. २० मार्च पासून मुनरो हे किल्ल्याला वेढा घालून बसले होते. मद्रास इथून सैनिक आणले होते. युद्धात उडालेले रक्त किल्ल्याच्या भिंतींवर पडले होते, किल्ला जिंकल्यानंतरही २२ दिवसांपर्यंत विजयाची खूण म्हणून हे रक्त पुसण्यात आले नव्हते.
१३ व्या शतकात या किल्ल्याची बांधकाम झाली होती. त्यानंतर विजापूरच्या याकूब अली खानने तो पुन्हा बांधला. वेगवेगळी संस्थाने आली आणि गेली. सर्वात शेवटी ब्रिटिश आणि त्यानंतर स्वतंत्र भारत झाल्यावर स्वतंत्र असा या किल्ल्याचा प्रवास आहे.
जनरल मुनरो यांनी किल्ला जिंकल्यावर आतील भागात ब्रिटिश सैन्याची राहण्याची व्यवस्था करून घेतली.
हा जिला जिंकून घेण्यासाठी ब्रिटिशांनाही अथक परिश्रम करून घ्यावे लागले.
यंदा हा किल्ला ब्रिटिशांनी जिंकून घेतल्याच्या घटनेस २०० वर्षे पूर्ण झाली आहेत. मुंबई मोहल्ल्याच्या गॅझेट मधून ही माहिती मिळते. तसेच ब्रिटिशांनी केलेल्या १८१७ ते १८१९ पर्यंतच्या लढायांवर आधारित पुस्तकातही याचा उल्लेख सापडतो.