मराठी कागदपत्रे देण्यास टाळाटाळ करणाऱ्या अधिकारी आणि अध्यक्ष शंकरगौडा पाटील यांना चांगलेच धारेवर धरण्यात आले. यावेळेस सर्व सदस्य यांनी जोरदार आवाज केल्यानंतर त्याबाबत हिंदीत अथवा ट्रान्सलेट करून मराठीत माहिती देण्याचे आश्वासन देण्यात आले. मात्र या बैठकीतच कागदपत्रे हवी असा पवित्रा घेण्यात आला. यावेळी गोंधळ माजला. त्यामुळे लवकरच कागदपत्रे देऊ, असे आश्वासन देण्यात आले.
तालुका पंचायत मध्ये गांधी सभागृहात ही बैठक आयोजीत करण्यात आली होती. यावेळी मराठी सदस्यांनी जोरदार आवाज उठवला आणि मराठी कागदपत्र देण्याबाबत ठराव करण्यात आला. कागदपत्रे मराठीत देण्यासाठी टाळाटाळ करणाऱ्यांवर कारवाई करा, असे ठणकावून सांगण्यात आले आहे.
यामुळे यापुढे जर कागदपत्रे मिळाली नाहीत तर सभागृहात ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे, असे सांगण्यात आले.
यावेळी मराठीत वारंवार मागणी करूनही का कागदपत्रे देण्यात आली नाहीत, असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे. त्यामुळे यापुढे जर कागद पत्रे मिळाली नाहीत तर शांत बसणार नाही, असे सांगण्यात आले.
यावेळी तालुका पंचायत सदस्य सुनील अष्टेकर, रावजी पाटील, काशिनाथ धरमोजी, वसंत सुतार, आप्पासाहेब कीर्तने, उदय सिद्दण्णावर हे उपस्थित होते.