बेळगावात कोणकोणत्या नगरपालिकेची निवडणूक आहे माहिती आहे का?
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची तारीख निवडणूक आयोगाने जाहीर केली असून यासाठी दोन टप्प्यात मतदान होणार आहे.राज्य निवडणूक आयुक्त श्रीनिवास चारी यांनी पत्रकार परिषद घेऊन निवडणूक प्रक्रिया जाहीर केली बेळगावात 29 आगष्ट रोजी मतदान तर 1 सप्टेंबर रोजी निकाल अशी प्रक्रिया होणार आहे.
बेळगाव जिल्ह्यात
गोकाक
निपाणी
बैलहोंगल
संकेश्वर
सौन्दत्ती
मुडलगी
चिकोडी
कुडची
हुक्केरी
सदलगा
रायबाग
खानापूर
कोंनूर
रामदुर्ग या नगर पालिका,नगर पंचायतीच्या निवडणुका होणार आहेत.
या निवडणुकांसाठी 10 आगष्ट पासून अधिसूचना लागू करण्यात येणार असून त्या दिवशी पासून नामांकन प्रक्रिया देखील प्रारंभ होणार आहे.या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत देखील ए व्ही एम मशीन चा वापर केला जाणार आहे असा निर्णय निवडणूक आयोगाने घेतलाय. राज्यात पोलिसां सह एकूण 40 हजार जण पोलीस बंदोबस्तासाठी तैनात केले जाणार आहेत.
108 स्थानिक स्वराज्य संस्थांची अवधी संपल्याने एकूण 23 नगर पंचायत,53 नगर पालिका,29 नगर सभा निवडणूक होत आहे.शिमोगा मैसूर आणि तुमकुर महा पालिकेच्या आरक्षण याचिका उच्च न्यायालयात प्रलंबित आहे त्याचा निकाल येताच या निवडणुका जाहीर करणार असल्याची माहिती देण्यात आली आहे