मागील चार वर्षापुर्वी मंजूर झालेले बाळेकुंद्री येथील पेठ गल्ली ते थोरला तलावापर्यंतच्या रस्त्याचे काम अनेक दिवसांपासून बंद करून याला मंजूर झालेले अनुदान लाटण्यात आले आहे. ६२ लाख रुपये मंजूर झालेला रस्ता कोठे आहे? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
इंजिनिअर आणि कंत्राट दाराच्या मिलीभगतचा परिणाम आता येथील नागरिकांना सहन करावा लागतो आहे.
या कामी कोणत्याही ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात घेतले नसल्याचे सांगत आहेत. या रस्त्यासाठी तलावाची माती काढून टाकण्यात आली आहे. हा रस्ता करण्यासाठी ग्राम पंचायतीने प्रयत्न केले. मात्र रस्ता काही झाला नाही.
आराखड्यात या रस्त्यावर ३ इंच डांबरीकरण करणे गरजेचे आहे. मात्र हा रस्ताच करण्यात आला नाही. तरीही ६२ लाख रुपये खर्च दाखविण्यात आला आहे. संबंधित इंजिनियर आणि कंत्राटदाराने हा निधी लाटला आहे, अशी तक्रार करण्यात आली आहे.
या रस्त्याचा निधी परत जाणार अशी भीती इंजिनियर आणि कंत्राट दाराला लागली होती. त्यामुळे त्यांनी रस्ता न करताच केल्याचे दाखवून हा निधी लाटला आहे. माजी आमदार संजय पाटील यांच्या कार्यकाळात हा रस्ता मंजूर करण्यात आला होता. मात्र अजूनही हा रस्ता करण्यात आला नाही. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.
या रस्त्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी टोलवाटोलवीची उत्तरे दिली आहेत. याबाबत जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आर रामचंद्रन यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे, मात्र त्यांनीही याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी केली आहे.
६२ लाख रुपये ज्यांनी खाल्ले त्यांनी जनतेची फसवणूक केली आहे. तेंव्हा अशी फसवणूक करणाऱ्या व्यक्तींना लागलीच अटक करून त्यांची रीतसर चौकशी होण्याची गरज आहे. लागलेला हा पैसे वरपर्यंत पोचवण्यात आला असून त्यामुळेच वरचे अधिकारीही कारवाई करण्याकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे.