सरकारच्या नवीन नियमानुसार आता कोणत्याही सरकारी अथवा खाजगी कार्यक्रमातून प्लास्टिक बाटलीबंद पाणी आता हद्दपार करण्यात येणार आहे. त्यामुळे यापुढे कोणत्याही कार्यक्रममध्ये या बाटल्यांचा वापर केल्यास कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती मिळाली आहे.
कोणत्याही सरकारी अथवा खाजगी कार्यक्रमात प्लास्टिक बाटल्याचा वापर हा पर्यावरणाला धोकादायक ठरू लागला आहे. कार्यक्रम झाल्यानंतर या बाटल्या जिकडेतिकडे फेकुन देण्यात येतात. त्यामुळे याचा परिणाम पर्यावरणावर होतो. याची दखल घेऊन सरकारने हे पाऊल उचलले आहे.
प्लास्टिक बाटलीबंद पाणी काही अधिकारी व मान्यवर कार्यक्रमात थोडे पिऊन सोडून जातात. त्यामुळे पाणी वाया जात असते. याचाही विचार करण्यात आला आहे. त्यामुळे यापुढे पुतळ्याचे ग्लास किंवा इतर साहित्यांचा वापर करण्याचा सल्ला सारकारणे दिला आहे.
या कार्यक्रमातुन प्लस्टिक बाटल्यांचा कचराही अधिक होत आहे, याचाही विचार करण्यात आला आहे. मात्र याची अंमलबजावणी करण्यासाठी आता नागरिकांनीही सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले असले तरी याबाबत विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे.