बेळगाव मध्ये मध्यवर्ती बसस्थानक निर्मितीचे काम सुरू आहे. या पाठोपाठ आता शहर बसस्थानकाच्या बांधकामाचे कामही पावसाळा थांबल्यावर लगेचच सुरू होईल. ३२.६६ कोटी रुपयात हे बांधकाम होणार आहे. तुमकुर येथील अपूर्वा कन्स्ट्रक्शन कंपनीला ही निविदा मंजूर करून कंत्राट देण्यात आले आहे.
३ डिसेंबर २०१६ पासून मध्यवर्ती बसस्थानकाच्या बांधकामाला सुरुवात झाली आहे.६५ टक्के काम पूर्ण झाले आहे. डिसेंबर महिन्यापर्यंत हे काम पूर्ण होऊ शकेल असा अंदाज आहे.
शहर बसस्थानक सुधारणेच्या प्रकल्पात आधुनिक बसस्थानक, पार्किंग विभाग, बस थांबण्यासाठी शेड, पाणी, अग्निशमन यंत्रणा यांचा समावेश असेल.
स्मार्ट सिटी लिमिटेड मधून शहर बसस्थानक नवीन स्मार्ट रुपात मिळणार आहे. यामध्ये वेटिंग रूम, बेसमेंट पार्किंग आणि स्वतंत्र कार पार्किंग सुद्धा असेल. तसेच स्काय वॉक चा समावेश असेल.
एकूण क्षेत्र: ८३८२.६ चौ मिटर
मजले: बेसमेंट आणि इतर पाच
बस बे: २८
दुकाने: २९०६.५५ चौ मिटर
व्यापारी क्षेत्र: २५९५.९४ चौ मिटर
दुसऱ्या मजल्यावर रेस्टॉरंट्स
असतील
पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावर परिवहन मंडळाची कार्यालये असणार आहेत.