बेळगावला राज्यधानीचा दर्जा देण्याचं आश्वासन मुख्यमंत्री एच डी कुमारस्वामी यांनी दिल असलं तरी कन्नड संघटनांत अखंड आणि वेगळं राज्य या विषयावरून मतांतरे निर्माण झाली आहेत.दोन प्रवाहातील फुटीचा प्रत्यय गुरुवारी आला.
कन्नड वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी वेगळं उत्तर कर्नाटक राज्य नको राज्याचं विभाजन नको म्हणून जिल्हाधिकारी कार्यालया समोर निदर्शन केली तर वेदिकेच्या कार्यकर्त्या समोरच उत्तर कर्नाटक विकास वेदिकेच्या वतीनं जिल्हाधिकारी द्वारा मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आलं.बेळगावला उपराज्यधानी चा दर्जा देऊन शासकीय कार्यालये सुवर्ण विधान सौध मध्ये पंधरा दिवसात निर्णय घ्या अन्यथा उत्तर कर्नाटक वेगळ्या राज्याची मागणी करू असा इशारा दिला.यावेळी दोन्ही संघटनांनी परस्परविरोधी घोषणाबाजी केली यावेळी जिल्हाधिकारी कार्यालया समोर बराच काळ तणावाचे वातावरण निर्माण झालं होतं.
उत्तर कर्नाटक वेगळं राज्य हवं म्हणून हुबळी येथील एका संघटनेनं उत्तर कर्नाटक बंद ची घोषणा केली होती बेळगावात त्याला एकही संघटनेनं बंद पाठिंबा दिला नाही मात्र बस किंवा इतर सुविधा सुरू होऊदेत यासाठी अखंड कर्नाटक साठी कन्नड वेदिकेच्या वतीनं बस स्थानकावर अनेक बस चालक प्रवासी आणि ऑटो चालकांना गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आलं.उत्तर कर्नाटक विकास वेदिकेच्या वतीनं आर टी आय कार्यकर्ते भिमापा गडाद,अडीवेश इटगी यांच्या वतीनं आंदोलन झालं तर कन्नड वेदिकेच्या वतीनं महादेव तलवार आणि गणेश रोकडे यांनी आंदोलन केले.
उत्तर कर्नाटकाच्या विकासाच्या मुद्द्यावर सध्या बेळगावात वातावरण तापलं असून मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी तीन शासकीय कार्यालये बेळगावात स्थलांतर करू अशी घोषणा करून बेळगावला उपराज्यधानीचा दर्जा देण्याच आश्वासन दिलंय ते आश्वासन कधी पूर्ण करतात उपराज्यधानी च्या दर्जाला तांत्रिक अडचणी आहेत त्यावर काय उपाय काढतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.