सिटी बस मधून उतरताना झालेल्या अपघातात महिला ठार झाल्याची घटना बुधवारी सायंकाळी घडली आहे. पुष्पा लालसिंह घगणे वय 50 रा. मारुती गल्ली खासबाग असे नाथ पै चौकात सायंकाळी साडे पाच च्या दरम्यान अपघातात ठार झालेल्या मयत महिलेचं नाव आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पुष्पा या गेले 10 वर्षे गोवावेस साई मंदिरात सेविका म्हणून काम करत असतात बुधवारी सकाळी त्या साई मंदिरला गेल्या होत्या सायंकाळी काम संपवून त्या सी बी टी बस ने घरी परतत होत्या नाथ पै सर्कल जवळ बस थांबताच उत्तरतेवेळी हा अपघात झाला आहे.दक्षिण विभाग रहदारी पोलिसात हा गुन्हा नोंद झाला आहे.
अपघात होताच त्यांना उपचारासाठी जवळच्या खाजगी इस्पितळात दाखल करण्यात आले होते मात्र त्यांचा मृत्यू झाला अपघात होताच बस चालकास जमावाने खडसावल्याची माहिती देखील मिळतआहे.