गुरुवारी बेळगावात बंद नसून केवळ निवेदन दिले जाणार आहे.उत्तर कर्नाटकाचा विकासा कडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करत विविध संघटनांनी उद्या गुरुवारी उत्तर कर्नाटक बंद ची हाक दिली होती मात्र काल झालेल्या सुवर्ण सौध समोरील आंदोलनात माजी मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा बंद करू नका असे आवाहन केले होते त्या नुसार गुरुवारी पुन्हा उत्तर कर्नाटकाचा विकास करा असे निवेदन दिले जाणार आहे.
तत्पूर्वी कालच्या माठाधिशांच्या धरणे आंदोलना नंतर मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी बेळगावातील सुवर्ण सौध मध्ये राज्यस्तरीय तीन कार्यालये स्थलांतर करू आणि लवकरच बेळगावला उपराज्यधानीचा दर्जा देण्याची घोषणा करू असे सूतोवाच्य केले होते.मुख्यमंत्र्यांचे आश्वासन आणि विरोधी पक्ष नेते बी एस येडियुरप्पा यांच्या आवाहना नंतर उत्तर कर्नाटक विकास व्हावा या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या बशुतांशी सर्वच संघटनांनी उद्या गुरुवारचा बंद मागे घेतला आहे.हुबळी स्थित एक संघटनेनं बंद आवाहन केलंय त्याला बेळगावात प्रतिसाद मिळणार नाही.
उत्तर कर्नाटक वेगळ्या राज्याची मागणी करणारे आर टी आय कार्यकर्ते भीमपा गडाद यांनी बेळगाव live शी बोलताना सांगितले उद्या बंद असणार नाही मात्र आम्ही पुन्हा एकदा निवेदन देणार आहोत.