लिंगायत वीरशैव स्वतंत्र धर्म व्हावा या मागणीसाठी केलेलं आंदोलन आणि उत्तर कर्नाटक या वेगळ्या राज्याची मागणी अशी दोन आंदोलने फसलेली आहेत. त्यामुळं सत्ताधारी पक्षाला अडचणीत आणण्यासाठी भाजपने रचलेली रणनिती त्यांच्याच अंगाशी आल्याचे चित्र दिसत आहे.
मागील निवडणूक निकालात मुळातच भाजपकडे सत्ता स्थापण्यासाठी अपुरे संख्या बळ असल्याने ते सत्तेपासून वंचित राहिले या राजकीय साठबाजीत मुख्यमंत्रीपद कुमारस्वामी यांनी मिळवले त्यामुळं सध्या भाजप डिस्टर्ब आहे.कुमार स्वामी यांनी घेतलेले निर्णय कसे चुकीचे आहेत याचे भांडवल करून सत्ता डळमळीत करण्याचा भाजपचा डाव जनतेला कळून चुकलाय, या शिवाय मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी निवडणूक पूर्व आश्वासनात आपण मुख्यमंत्री झाल्यास २४ तासाच्या आत शेतकऱ्यांची कर्जे माफ करण्याचं आश्वासन दिलं होतं आता ते आश्वासन त्यांनी पूर्ण केलंय त्यामुळं विरोधी पक्षा कडे मुद्दा नाही त्यामुळेच गैर मुद्दे पुढे करून सत्ता हस्तगत करण्याचा प्रयत्न चालल्याचे दिसते.
मात्र भाजप पक्ष श्रेष्ठीनी स्थानिक भाजप नेत्यांना आमदार फोडून सरकार बनवू नका असा सल्ला दिल्याने प्रदेश भाजप नेते तोंडघशी पडलेत स्वतंत्र उत्तर कर्नाटक व्हावं अशी मागणी पुढे करून चालवलेल्या या आंदोलना मागे भाजपच आहे हे लपलेलं नाही.
उत्तर कर्नाटकाच्या विकासावर अन्याय केल्याचा आरोप करून सुवर्णसौध समोर मठाधिशानी जे ठाण मांडलं होतं ते आंदोलन एक नाटकच होतं या नाटकाचा समारोप करण्यासाठी बी एस येडियुरप्पा उपस्थित होते.स्वतंत्र उत्तर कर्नाटकाच्या मागणीत कोणताही राजकीय पक्ष सामील नाही असे म्हणणाऱ्यानी व्यासपीठावर येडियुरप्पा यांना कशी काय संधी दिली?असा प्रश्न देखील यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
सुवर्ण सौध मुळे बेळगाव अविकसित झालाय या आरोपाला कुमारस्वामी आपण उत्तर आणि दक्षिण असा भेदभाव करणार नाही, लवकरच उत्तर कर्नाटकाचा दौरा करून समस्या जाणून घेऊ असं ठाम आश्वासन दिलंय या शिवाय बेळगावला उपराजधानी चा दर्जा देणे आणि तीन शासकीय कार्यालये सुवर्ण सौध मध्ये हलविण्यात येणे बाबत लवकर घोषणा करू असे सांगत त्यांनी आंदोलकांची तोंडेच बंद केली आहेत त्यामुळे कर्नाटक भाजपची स्थिती कोळी कीटक जसा स्वतः भोवती जाळे निर्माण करून अडकतो तशीच झाली आहे.
-प्रशांत बर्डे जेष्ठ पत्रकार