स्मार्ट सिटी योजने अंतर्गत शहरातील सिटी बस स्थानकाचा कायपालट होत असताना रेल्वे स्टेशन समोरील गोवा बस स्टँडचे देखील सुशोभीकरण केले जाणार आहे.
स्मार्ट सिटी योजनेत या बस स्टँड च्या विकासासाठी दोन कोटी रुपये मंजूर करण्यात आले असून आगामी एक वर्षात सदर बस स्थानक सर्व सोयींसह दिसणार आहे.या कामासाठी छावणी सीमा परिषदेने देखील अनुमती दिली आहे.
कॅन्टोमेंट सी इ ओ दिव्या शिवराम यांनी छावणी सीमा परिषदेच्या मासिक बैठकीत या बस स्थानक सुशोभिकरणाची माहिती दिली.बस स्थानकाच्या गाळ्यातून येणारे उत्पन्न सध्या अर्धे स्मार्ट सिटी तर अर्धे कॅटोंमेंट मध्ये वितरित केले जाणार आहे तर 30 वर्षांनी पूर्णपणे कॅटोंमेंट ला मिळणार आहे.
एकूण दीड एकर हुन अधिक जागेत असणारे हे बस स्थानकात बस थांबवण्यासाठी आधुनिक ट्रॅक आणि स्टो लची निर्मिती केली जाणार आहे.या कॉम्प्लेक्स मधील कमीत कमी जागेत जास्त गाळे बनवले जाणार आहेत.
कॅटोंमेंट परिसर एल ई डी ने उजळणार विजेची बचत व्हावी या उद्देशाने या परिसरात एल ईडी बलब बसवले जाणार सर्व कार्यालयात सोलार रुफ टॉप पॅनल बसवण्यात येणार आहे