देशात ५६३ वा रँक घेऊन यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण झालेला बेळगावचा सुपुत्र निखिल निप्पाणिकर हा आयएएस बनला आहे. त्याच्या यशाने त्याचे स्वप्न पूर्ण झाले आहे.
सरकारी नोकरीत जाऊन जनतेची सेवा करणे हे त्याचे स्वप्न होते. सेंट पॉल चा विध्यार्थी असलेला निखिल पहिला अभियंता झाला पण हे स्वप्न त्याला शांत बसू देत नव्हते अखेर यूपीएससी परीक्षेला बसून पहिल्याच वेळी त्याने ती पार केली आणि मोठे यश मिळवले आहे.
या यशात आपल्या कुटुंबाची साथ मोठी आहे असे त्याने सांगितले. काका किरण निप्पाणीकर, आत्या लक्ष्मी निप्पाणीकर, मिलिंद सुळगेकर यांनी चांगली प्रेरणा दिली आणि हे यश मिळू शकले असे त्याने सांगितले.
आपले ध्येय ठरवा आणि ते साध्य करण्यासाठी योग्य नियोजन करा असे तो सांगतो. बेळगाव मधील जास्तीतजास्त तरुण या क्षेत्रात चमकले जावे ही त्याची इच्छा असून त्यासाठी कुणाला मार्गदर्शन पाहिजे असेल तर आपण कायम तयार असेन तुम्ही फक्त तयार व्हा असे त्याने युवकांना सांगितले.