फुटपाथवर होणारे अतिक्रमण आणि पार्किंग मुळे लोकांना रस्त्यावरून चालावे लागते आणि अपघात होतात. काही कॉलेज रोड सारख्या प्रमुख रस्त्यांवरील फुटपाथवरून चालण्यास जागाच मिळत नाही. ही बेळगाव शहरातील वस्तुस्थिती आहे, कारण तिथे बाईक पार्क केल्या जातात.
हा प्रकार आता जास्त वेळ चालणार नाही. आज पोलीस आयुक्त डॉ डी सी राजप्पा यांनी अशा फुटपाथवर पार्किंग करणाऱ्यांचा चांगलाच बंदोबस्त केला आहे. यापुढे असे पार्किंग किंव्हा अतिक्रमण करून फुटपाथ अडवणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे.पोलीस आयुक्तांनी याबद्दल एक प्रेस नोट काढली आहे.
बेळगाव शहराच्या वेगवेगळ्या भागात अशीच परिस्थिती आहे. चालणाऱ्यांच्या हक्काची जागा विक्रेते किंव्हा वाहन चालक अडवून ठेवत आहेत आणि याचा फटका वृद्ध व्यक्ती, लहान मुले व स्त्रियांना होत आहे. याबद्दल पोलीस आयुक्तांनी घेतलेली भूमिका चांगली आहे. फुटपाथ अडवणाऱ्यांवर दंड लावा असा आदेश ट्राफिक पोलिसांना देण्यात आला आहे.
पादचाऱ्यांना त्रासात घालण्याचे प्रकार वाढत आहेत.शाळेला जाणाऱ्या मुलांना याचा जास्त त्रास होतोय. त्यामुळे नागरिकांनी फुटपाथवर आपली वाहने लावू नये अशी सूचना केली आहे.
फुटपाथ हे पूर्णपणे पादचाऱ्यांसाठीच आहेत. जो कोणी त्यावर अतिक्रमण करेल तो दंडास पात्र आहे. रहदारी पोलिसांनी फुटपाथ मोकळे करण्याची मोहीम सुरू केली आहे. या महिन्यात पूर्ण शहरात फेरफटका मारून ते मोकळे करणार आहेत.
.कायदा काय म्हणतो… जर एखाद्याची गाडी फूटपाथवर किंवा रहदारीला अडथळा होईल अशी पार्क केलेली असेल तर शंभर रूपये दंड आणि पोलिसाकडे वाहन सुपुर्द. कलम २८३ हे दखलपात्र आहे त्यात पोलिस तुमच्यावर एमआयआर दाखल करून तुम्हाला कोर्टात पाठवू शकतात.
कलम २८३ लोकांना अडथळा करणे.. जर कुणी इसम आपल्या ताब्यातील वस्तूने धोकादायक , अडथळा किंवा इतरांना (व्यक्तीना) त्रासदायक पादचारींना ठरत असल्यास दोनशेहे रूपये दंड ठोठावण्यात यावा…आता असे चुकीचे वागणाऱ्यांनी सावध होऊन वागावे लागणार आहे