चोरांची टोळी आली आहे, किंवा धार्मिक तेढ निर्माण करणारे मेसेज सोशल मिडियावर पाठवून समाजात एकिकडे तेढ पसरवत असताना दुसरीकडे ‘माणुसकी’ जिंवत ठेवणारी घटना घडली आहे.
सोशल मीडियावर याचा वापर चांगल्या कार्यासाठीही होऊ शकतो हे शहरातील राजगुरू युवक मंडळाच्या कार्यकर्त्यांनी दाखवून दिलंय. दवाखान्याला जाणाऱ्या महिलेचे बाजारात हरवलेले पैश्यांचे पाकीट पुन्हा राजगुरू युवक मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या प्रामाणिक पणामुळे परत त्या महिलेला सुखरूप मिळालं आहे.
सोमवारी सायंकाळी आझाद गल्लीतील महिला मुमताज पन्हाळी या दवाखान्याला दुचाकी वरून जात असतेवेळी यांचे पैशाचे पाकिट रस्त्यावर पडले होते. ते राजगुरू युवक मंडळाचे कार्यकर्ते राजू पाटील यांना सापडलं. राजू यांनी सदर पाकीट राजगुरू युवक मंडळाच्या ताब्यात देऊन मालकापर्यंत पोचविण्याची विनंती केली. त्यानुसार,मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सोशल मीडियाचा अवलंब केला.
मंगळवारी सकाळी मराठी युवा मंचचे सुनिल जाधव, विजय मोहिते, सतीश घसारी, निकेतन मेणशे आदींनी सापडलेल्या पाकीटातील लहान मुलांचा फोटो सह पैशाच्या पाकिटाची फेस बुक वर प्रसिध्दी करून परत नेण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर सुदर्शन नाईक रा गांधीनगर यांनी सोशल मीडियातील लहान मुलांचा फोटो पाहून हा मुलगा आपल्या मुलाच्या वर्गातील आहे हे जाणवल्यावर त्यांनी मुमताज पन्हाळी यांचे जावई शबीर बागवान याना संपर्क करून त्यांना त्यांच्या हरवलेल्या पाकिटाची लहान मुलाच्या फोटोची कल्पना दिली त्यानुसार बुधवारी सकाळी शबीर बागवान आपल्या परिवारसह टेंगिणकेरा गल्लीत येऊन आपले पाकीट परत घेतले पाकीटा बरोबर 11 हजार 310 रोख रक्कम देखील मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सुपूर्द केली.
‘हल्ली सर्वत्र चोऱ्या आणि फसवणुकीचे प्रकार घडत असतानाच चांगली माणसे आजही आहेत, याचा प्रत्यय येतो,’ अशी भावना बागवान यांनी व्यक्त करत माणुसकी पाळल्या बद्दल राजगुरू युवक मंडळाचे आभार मानले.यावेळी उपस्थित मल्लिकार्जुन बैलुर, राजू पाटील सुनिल जाधव, सतीश घसारी, विजय मोहिते ,निकेतन मेणशे , यासह गल्लीतील युवक आणि नागरिक उपस्थित होते.
अशा ‘या’ माणुसकी जपणा-या माणसांना Belgav live चा सलाम….