शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष संभाजी भिडे गुरुजी यांच्या वर पुन्हा एकदा कर्नाटकात प्रवेश बंदीचा आदेश जिल्हाधिकारी एस जिया उल्ला यांनी बजावला आहे.
याच महिन्यात 21 जुलै रात्री 12 पासून 11 दिवसांच्या काळासाठी म्हणजे 31 जुलै मध्यरात्री 12 पर्यंत बेळगाव जिल्ह्यात प्रवेश बंदी करण्याचा आदेश बजवण्यात आला आहे.बेळगाव जिल्ह्यातील हुक्केरी तालुक्यातील संकेश्वर मध्ये रायगड सुवर्ण सिंहासन या विषयावर गजानन सांस्कृतिक भवन येथे 21 जुलै रोजी या शिव प्रतिष्ठान च्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी ते बेळगावला येणार होते.
महाराष्ट्रातील भीमा कोरेगाव दंगली भिडे गुरुजी यांच्या प्रक्षोभक भाषणाने झाल्या होत्या असा आरोप होता त्यानंतर बेळगाव शहरात देखील एक कार्यक्रम आयोजित केला होता त्यावेळी देखील बेळगाव प्रशासनाने बंदी आणली होती आता पुन्हा संकेश्वर येथील कार्यक्रमावर देखील भिडे गुरुजींवर बंदी घालण्यात आली आहे.
शिव प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष संभाजीराव भिडे यांची भाषण दोन समाजात तेढ निर्माण करणारी असतात त्यामुळं बेळगावात कायदा आणि सुव्यवस्थेची समस्या उदभवू शकते कोणाच्याही भावनांना त्रास होऊ नये म्हणून भिडे गुरुजी यांच्या वर बेळगाव प्रवेश बंदी केली असल्याचे जिल्हाधिकारी एस जिया उल्ला यांनी पत्रकात म्हटलं आहे.