बेळगाव शहराची निवड स्मार्ट सिटी मध्ये होऊन तीन वर्षे उलटली तरी शहराच्या स्मार्ट करणाचे काम अद्याप एक तसूभर ही पुढे सरकलेलं नाही याला प्रशासन व स्थानिक राजकारण्यांचा वाढता हस्तक्षेप कारणीभूत मानला जात आहे.
केंद्र सरकारने देशातील महत्वाच्या शहरांच्या विकासासाठी विशेष निधी मंजूर केला बऱ्याच शहरांना राज्य सरकार कडून मिळणारे अनुदान हे अपुरे असल्याने व बहुसंख्य महत्वाची शहर पायाभूत सुविधा पासून वंचित असल्याचे निदर्शनास आल्या नंतर हा विशेष निधी स्मार्ट सिटी योजनेखाली केंद्राने मंजूर केला.या योजने अंतर्गत बेळगाव शहराला 380 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला गेला त्या वेळेचे तात्कालीन केंद्रीय नगरविकास मंत्री वेंकय्या नायडू यांनी देशातील अश्या 21 शहरांची निवड या योजनेत केली आहे.
एकीकडे स्थानिक स्वराज्य संस्था निधी नसल्याची ओरड करत असतात निधी नसल्यामुळे विकास खुंटतो असा आरोप केला जातो मात्र बेळगाव पालिकेकडे पुरेसा निधी असून देखील हे विकासाचं घोडं कुठं पेंड खात आहे अशी चर्चा नागरिकांत प्रकर्षाने होताना दिसते. दुसरीकडे हा निधी केंद्र सरकारने मंजूर केल्याने त्याच राजकीय श्रेय भाजपला मिळेल या हेतूने देखील या प्रकल्पाची दिरंगाई होत असल्याचा आरोप भाजप खासदारां कडून केला जात आहे.सत्ताधारी काँग्रेस आमदारांत या योजने अंतर्गत मंजूर झालेली महत्वाची विकास कामे आपल्या मतदार संघात कशी कशी वळवायची याकडे अधिक लक्ष पुरवताना दिसतात. स्मार्ट सिटी योजने अंतर्गत बेळगाव शहरात असंख्य मोठं मोठे प्रकल्प राबवण्यासाठीचे आराखडे तयार आहेत त्यांचे डेमो देखील झालेले आहेत.अनेक प्रकल्पाना राज्य शासनाची मंजुरी मिळून निविदा देखील झालेल्या आहेत मात्र या योजनांच्या प्रत्यक्ष अंमलबजावणी साठी लागणारे तज्ञ सल्लागार,हायटेक मशिनरी व कुशल अधिकारी वर्गाचा अभाव जाणवतो.
पालिकेत आयुक्त सतत बदलत असल्याने याचा परिणाम या योजनेवर झाला आहे असल्याचे एक कारण मानले जाते योजना लागू झाल्या पासून महापालिकेत तीन अधिकारी बदलले आहेत त्यामुळं नवीन अधिकारी आल्याने पुन्हा नव्याने उजळणी करावी लागते.जर का स्मार्ट सिटी योजना यशस्वी करायची असेल तर स्थिर अधिकारी हवेत पालिका आयुक्त देखील आय ए एस दर्जाचा हवा.इतकंच नव्हे तर स्मार्ट योजनेस गती यायची असेल तर एम.डी.म्हणून राकेश सिंह किंवा राजेंद्र कटारिया आणि अतुल कुमार तिवारी यांच्या सारखे अधिकारी नेमल्यास या योजनेला गती मिळेल यात शंका नाही.
प्रशांत बर्डे
(जेष्ठ पत्रकार बेळगाव)