शहरात वारंवार होत असलेल्या अपघातामुळे अखेर पोलीस खात्याने शहरात मध्यम आणि अवजड वाहनांना प्रवेश बंदीचा करण्याचा आदेश जारी केला आहे.सम्राट अशोक सर्कल,कित्तूर चन्नम्मा चौक,धर्मवीर संभाजी चौक,गोगटे सर्कल,शाहपूर गोवा वेस या रस्त्यावर रहदारीला अडथळे होऊन अनेक अपघात होत आहेत त्यामुळे पोलीस आयुक्त डी सी राजप्पा यांनी हा निर्णय घेण्यात आला आहे.
गोवा बंगळूरू आणि गोवा पुणे या रस्त्यावर शाळा कॉलेजिस,न्यायालय इस्पितळ सरकारी कार्यालये,बाजारपेठ व्यापारी संकुले आहेत मुळातच शहरात रहदारीला अडचणी निर्माण झाल्या आहेत त्यामुळे विध्यार्थ्यांना लहान मोठ्या अपघातांना सामोरे जावे लागत आहे वाहन चालकांना त्रास सहन करावा लागत आहे त्यामुळे अपघात टाळण्यासाठी पोलीसा कडून उपाय योजना म्हणून सकाळ सायंकाळ गर्दीच्या वेळी अवजड आणि मध्यम अवजड वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे.
शहरातील सर्व महापालिका आणि छावणी सीमा परिषदेच्या कार्यक्षेत्रातील रस्त्यावर सकाळच्या सत्रात ८ ते १२ आणि सायंकाळी ४ ते ८ च्या दरम्यान अवजड वाहनांना प्रवेश बंदी लागू केली आहे.मंगळवारी सकाळी पोलीस आयुक्त कार्यालयात विविध ट्रान्सपोर्ट कंपन्या,लॉरी मालक असोसिएशन, यांची बैठक झाली त्यात सर्वांनी शहरात अवजड वाहनांना प्रवेश बंदी बाबत अनुकुलता दर्शवली आहे.कुणालाही ट्रान्सपोर्ट कंपनी किंवा इतरांना आक्षेप असल्यास पोलीस आयुकतांना संपर्क साधण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे.