Thursday, December 5, 2024

/

‘कचऱ्यासाठी नागरिकांचे आरोग्य टांगणीला’

 belgaum

शहर परिसरात कचऱ्याची समस्या नागरिकांना त्रासदायक ठरते ही नित्याचीच बाब आहे. वेळेत कचरा उचल होत नसल्याने आणि महानगरपालिकेकडे अपुऱ्या सफाई कामगार असल्यामुळे ही समस्या भेडसावणारी ठरत आहे. शहर परिसरात अनेक कचरा कुंडी ठेवण्यात आल्या आहेत. मात्र या कुंडी भरून त्यातील कचरा बाहेर पडण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

Ccb kachara
शहराच्या मध्यवर्ती भागात अनेक कचरा कुंडी ठेवण्यात आल्या आहेत. स्वच्छ बेळगाव आणि सुंदर बेळगाव ही ओळख असलेल्या बेळगावचे नावच बदलण्याची गरज निर्माण झाली आहे. बेळगाव परिसरात सुमारे ३०० टन कचरा रोज तय्यार होतो. मात्र त्याची विल्हेवाट लावण्यासाठी मनपा ठोस योजना राबवीत नसल्याचे दिसून येते आहे. कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी मनपाने नूतन सफाई कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणे आवश्यक आहे. आणि महत्त्वाचे कर्मचाऱ्यांच्या मागण्याकडेही दुर्लक्ष करून त्यांची हेळसांड करण्यात येत आहे.
कंत्राटी पद्धतीवर कामगारांना नेमून कंत्राटदार नागरिकांच्या आरोग्याशी खेळण्याचा प्रकार करत आहेत. वेळेत कचरा उचल न झाल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच विविध रोगांना आमंत्रण मिळत आहे.
सध्या उपनगरात डेंग्यू चे रुग्ण आढळले आहेत. तसेच इतर संसर्गजन्य रोगांचा प्रदूर्भावही वाढला आहे. त्यामुळे कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी ठोस उपाय योजना करण्यासाठी प्रशासनाने धडपड करणे गरजेचे आहे.
शहरातील बहुसंख्य ठिकाणी कचरा कुंडीतील कचरा बाहेर पडतो. त्याची वेळीच उचल न झाल्याने तो कचरा रस्त्यावर पडत आहे. नागरिकांना त्या कचऱ्यातूनच वाट काढावी लगत आहे. त्यामुळे यापुढें कचऱ्याची वेळीच उचल करून नागरिकांच्या समस्या दूर करण्यासाठी प्रयत्न करावे अशी मागणी करण्यात येत आहे.
कचऱ्याच्या नावावर पैसे खाणारे नगरसेवक आणि मनपाचे अधिकारीच याला कारणीभूत असून त्यांनी कचऱ्यातील पैसे खाणे थांबवल्यास शहर नक्कीच स्मार्ट होऊ शकेल.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.