‘बेळगाव शहराच्या 58 प्रभागा पैकी उर्वरित46 प्रभागासाठी राबविण्यात येणाऱ्या चोवीस तास पाणी पुरवठा योजनेचा खर्च कामाच्या दिरंगाई वाढतच चालला आहे.
शहराला चोवीस तास पाणी पुरवठा करण्याची योजना जुनी योजना असून 2008 साली या योजनेसाठी पालिकेत ठराव मंजूर करण्यात आला होता आणि त्या नंतर या प्रस्तावाला राज्य सरकारने मंजुरी दिली होती.सदर योजना ही जागतिक बँकेच्या सहकार्याने राबविण्यात आली असून 58 प्रभागा पैकी 12 प्रभागात प्रायोगिक रित्या सुरू करण्यात आली या योजनेच्या यशस्वीते नंतर ही योजना 46 प्रभागात राबवण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
बेळगाव पालिकेच्या 12 प्रभागात सुरू असलेली 24 तास पाणी पुरवठा योजना महागडी असल्याची तक्रार पाणी ग्राहक करतात मात्र या योजनेमुळे पाण्याची बचत होते व ग्राहकांना पुरेश्या पाण्याचा पुरवठा होतो असा दावा पालिकेचे अधिकारी करताना दिसतात विशेष म्हणजे या चोवीस तास पाणी पुरवठा योजनेवर ग्राहक समाधानी आहेत मात्र उर्वरित 46 प्रभागातील पाणी पुरवठ्या साठीची योजना रेंगाळली आहे.
या योजनेसाठी तीन वेळा निविदा मागवण्यात आल्या होत्या मात्र तांत्रिक कारणांमुळे त्या प्रलंबित राहिल्या.चोवीस तास पाणी पुरवठा निविदाचे नियम अटी कठीण आहेत त्यामुळे कोणताही ठेकेदार काम घेण्यासाठी पुढे येताना दिसत नाही उर्वरित 46 प्रभागांना चोवीस तास पाणी पुरवठ्याच्या या योजनेचा खर्च दिरंगाई मुळे वाढत चालला आहे या योजनेसाठी साडे चारशे कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे आता पुन्हा नव्याने निविदा कश्या प्रकारे मागवायच्या असा पेच पालिका अधिकाऱ्यां पुढे आहे.
पालिकेच्या एकूण 58 प्रभागात चोवीस तास पाणी पुरवठा करण्यासाठी लागणाऱ्या पाण्याची उपलब्धता आहे हिडकल व राकस्कोप या जलाशयातील पाण्याचा वापर या योजनेसाठी करण्यात येतो मात्र या प्रकल्पाला होणाऱ्या विलंबामुळे संबंधित प्रभागातील नागरिकांचा दबाव ही ,योजना आपल्या प्रभागात राबवावी यासाठीच वाढत चालला असला तरी नवीन योजना अमलात आणण्यासाठी निविदा मधील तांत्रिक त्रुटी दूर झाल्याशिवाय हा तिढा सुटणार नसल्याचे दिसून येते.
प्रशांत बर्डे(जेष्ठ पत्रकार)