कर्नाटकचे एकीकरण झाल्यानंतर उत्तर कर्नाटकासाठीचा मोठा लढा सुरु झाला आहे सत्याग्रह करावी अशी परिस्थिती एकीकरण नंतर कधीच आली नव्हती मुख्यमंत्री कुमारस्वामी यांचे बेजाबदार पणाचे वक्तव्य या आंदोलनास कारणीभूत आहे. उत्तर कर्नाटकात आग लावण्याचे काम तुम्ही करत आहात अशी माध्यमांची थट्टा करणे योग्य नव्हे अशी टीका भाजप प्रदेशाध्यक्ष माजी मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा यांनी केली आहे.
मंगळवारी सकाळी बेळगाव दौऱ्यावर आले असता पत्रकार परिषदेत त्यांनी हे वक्तव्य केले आहे. कुमारस्वामी हे जातीचे विष पेरत आहेत असा आरोप करत २ तारखेला बंद करू नका १०४ आमदारांची सदस्य संख्या असलेले विरोधी पक्ष म्हणून सभागृहात आणि बाहेर देखील आंदोलन करण्यास सज्ज आहे आलूर वेंकटराव कुवेम्पू शिवराम कारंथ आणि बेंद्रे सारख्या कवी साहित्यिकांच्या योगदाना मुळे कर्नाटकचे एकीकरण झाले आहे. मुंबई मद्रास केरळ आणि हैदराबाद कर्नाटक मधला कन्नड प्रदेश एकत्रित करून कर्नाटकाचे एकीकरण करण्यात आले त्यामुळे कर्नाटक एकसंघ राहावा हेच ध्येय आहे असे ते म्हणाले.
एक पंतप्रधान म्हणून देवेगौडा यांचे उत्तर कर्नाटकासाठी काय योगदान असा सवाल करत त्यांनी मठाधिशांचे मन परिवर्तन करण्या ऐवजी कुमारस्वामींनी आग लावण्याचा प्रयत्न केला आहे राज्याला तांदूळ आणि विद्युत पुरवठा उत्तर कर्नाटकातूनच केला जातो.
अलमट्टी जलाशयाची उंची वाढवण्याचे जून अर्धवट आहे विविध खात्यातून ४० हजार पदे खाली आहेत मात्र केवळ चार हजार पदे भरण्यात आली आहेत. अलमट्टी जलाशयांची उंची वाढवण्याचे कामाचे ९ कोटी रुपये कृष्णा राजसागर धरणाला का दिला याचे उत्तर कुमारस्वामींनी द्यावे असा सवाल देखील त्यांनी केला. आमदार उमेश कत्ती,महादेवाप्पा यादवाड, ए एस पाटील नडहळळी, महांतेश कवटगीमठ,विश्वनाथ पाटील अनिल बेनके आदी यावेळी उपस्थित होते.