Tuesday, December 24, 2024

/

तहसीलदार भूमी सेक्शन विरोधात लोकायुक्तांकडे तक्रार

 belgaum

तहसीलदार कार्यालयातील भूमी विभागात भ्रष्टाचार सुरू आहे यावर त्वरित कारवाई झाली पाहिजे अशी मागणी भ्रष्टाचार निर्मुलन आणि सामाजिक संस्थेच्या वतीनं करण्यात आली आहे.सोमवारी सकाळी जिल्हाधिकारी आणि लोकायुक्त कार्यालयात तहसीलदार कार्यालयातील गैर कारभार जनतेच्या गैरसोयी बद्दल तक्रार करण्यात आली.

तहसीलदार कार्यालयात भूमी विभाग म्हणजे त्याठिकाणी वारसा, संमती, खरेदी, हक्कपत्र यासह इतर जमिनीची नावे चढविणे, कमी करणे अशी कामे होत असतात. सकल नवीन कायद्यानुसार ४५ दिवसांच्या आत नावे चढविणे आणि कमी करणे आवश्यक आहे. मात्र याकडे दुर्लक्ष करून पैसे मागण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत.

Bhumi section
सर्व सामान्य शेतकरी आणि नागरिक या कार्यालयात येत असतात. मात्र काही वर्षांपासून सदर कार्यालय म्हणजे भ्रष्टाचाराचा अड्डा बनला आहे. सदर कार्यालयाचे शिरस्तेदार पासून सारेच जण कामासाठी आलेल्या लोकांची छळवणूक करत असल्याचा आरोप संस्थेने केलालोकायुक्तांकडे दिलेल्या निवेदनात केला आहे.

या कार्यालयात जाण्यासाठी सर्व सामान्य घाबरत आहेत. तेथे होणारी पिळवणूक व पैशासाठी अडवणूक ही नागरिकांची डोके दुखी बनत चालली आहे. अनेकांना कागद नाही म्हणून होणारी छळवणूक व नंतर तो कागद नाही म्हणून त्या अर्जाकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. या कामात गैरव्यवहार होत आहे असेही जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे.यावेळी वकील नामदेव मोरे,जिल्हा पंचायत सदस्य नागेश देसाई,साजिद सय्यद,सुनील जाधव आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.