बेळगावची जनता प्राणी प्रेमी आहे निसर्गाचे आणि बेळगावकरांचं नाते अतूट आहे आजू बाजूला पसरलेली जंगल झाडी, कॅम्प सारखा निसर्ग रम्य परिसर वॅक्सीन डेपो ची झाडी हे सगळं नैसर्गिक रित्या बेळगावला हे एक देणंच लाभलेल आहे. याच अनुषंगाने शहरातील बऱ्याच घरात प्राणी पाळले जातात मांजर कुत्री अश्या प्रकारचे प्राण्यांची जवळ जवळ प्रत्येक घरात बडदास्त ठेवली जाते परंतु याच कुत्र्यांना बाहेर फिरायला घेऊन जाताना श्वान प्रेमींच कुठं तरी भान सुटतय असच दिसून येत आहे
.आपली स्वच्छ घरे, उंची दिवाण खांने, चखचखीत आंगणे या पाश्ववभूमीवर आपला परिसरही स्वच्छ ठेवला पाहिजे याच भान कुठं तरी चुकतंय.
सकाळच्या वेळी शहर उपनगरात फेर फटका मारला असता जिकडे तिकडे पाळीव श्वानाना बाहेर फिरवणारे मालक दिसतात फिरवतेवेळी ती श्वान बाहरेच रस्त्यावर मलमूत्र करतात या अस्वच्छतेस कोण जबाबदार आहे ? किळसवाणा परिसर बघताना मोदींनी दिलेल्या स्वच्छ भारत अभियानाची कुठं तरी पायमल्ली होतेय असं जाणवतंय श्वान प्रेमीनो आपल्या घरा बरोबर आपलं गाव आपला परिसर स्वच्छ ठेवणे हि आपली जबाबदारी आहे हेच ध्यानात ठेवावे लागेल.
स्मार्ट बेळगावची स्मार्ट पालिका कुत्रा नोंद करून घेते का श्वानांची नोंद करूनकर घेतला जातो का देखील संशोधनाचा विषय आहे एकूणच बाहेर रस्त्यावर घाण करणाऱ्या प्राण्यांना आवरण्याची गरज आहे.