पावसाळ्यात सर्वात जास्त पडलेल्या खड्यांच्या संख्येमुळे काँग्रेस रोड जास्त चर्चेला आला होता. या महिन्यात तरी सगळीकडे याच रोड ची चर्चा झाली. आता महानगरपालिकाने हा काँग्रेस रोड पूर्णपणे काँक्रेटने बनवण्याचा निर्णय घेतला आहे. आता काँग्रेस रोड चे काँक्रीट भाग्य उजळणार आहे.
बेळगाव स्मार्ट सिटी लिमिटेड च्या सल्लागार समितीने दिलेल्या सूचनेवरून हा निर्णय घेण्यात आला आहे. ही सूचना सहा महिन्यापूर्वीच करण्यात आली होती. शनिवारी याबद्दल बैठक घेण्यात आली. मनपा आयुक्त आणि स्मार्ट सिटी लिमिटेड चे एमडी असलेले शशीधर कुरेर यांनी यावर शिक्कामोर्तब केले. झाडांमुळे डांबरी रस्ता टिकत नाही यासाठी काँक्रीट चा रस्ताच उपयोगी पडेल असे त्यांनी सांगितले.
नव्या काँक्रीटच्या काँग्रेस रोडवर दोन्ही बाजूनी गटार, फुटपाथ आणि सायकल ट्रॅक येणार आहे. सर्व प्रकारचे केबल घालून झाल्यावर हा रस्ता केला जाईल. तो पुन्हा खणता येणार नाही. पावसाळा संपताच कामाला सुरुवात होईल.
सध्या खड्डे पडलेल्या ठिकाणी पेव्हर्स घालून तात्पुरती सोय केली जाणार आहे.
हा मुद्दा महत्वाचा
सध्या रेल्वे ओव्हर ब्रिज चे काम सुरू आहे, तेंव्हा ते पूर्ण होईपर्यंत काँग्रेस रोडवर रहदारी जास्त असणार आहे. ब्रिजचे काम पूर्ण होऊन तो वाहतुकीस खुला झाल्यावरच काँग्रेस रोड चे काम सुरू करणे गरजेचे आहे.